एमजेपीचे जलसेवकांचे बेमुदत उपोषण, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी
By वैभव गायकर | Updated: June 12, 2023 16:40 IST2023-06-12T16:39:52+5:302023-06-12T16:40:15+5:30
कोंकण भवन परिसरात एकजेपीचे चार कर्मचारी प्राथमिक स्वरूपात उपोषणाला बसले आहेत.

एमजेपीचे जलसेवकांचे बेमुदत उपोषण, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी
पनवेल : एमजेपीच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील जलसेवक तब्बल 30 वर्ष उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रामाणिक आणि इमाने इतबारे काम करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या जलसेवकांना सेवेत कायस्वरूपी करून शासकीय लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याने या कर्मचाऱ्यांनी दि.12 रोजी बेमुदत उपोषणाचा हत्यार उगारला आहे.
कोंकण भवन परिसरात एकजेपीचे चार कर्मचारी प्राथमिक स्वरूपात उपोषणाला बसले आहेत.या उपोषणकर्त्यांमध्ये विष्णू पवार,जनार्दन भोईर, विठ्ठल वनासरे, गोणाप्पा विश्वकर्मा यांचा समावेश आहे. 22 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या,चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तुलनेने सोयी सुविधा व वेतन द्या, 2009 ते 2023 पर्यंत फरकाची रक्कम त्वरित अदा करावी, पीएफची थकीत रक्कम त्वरित अदा करावी, ग्रॅच्युटी, ईपीएफ त्वरित अदा करावी या महत्वपूर्ण मागणीसाठी हे कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर यांचाही या आंदोलनाला पाठिंबा आहे. उपोषणाची माहिती मिळताच एमजेपीचे उपअभियंता के बी पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली व आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली.
दुसऱ्यांचा उपोषण
2019 साली या कामगारांनी याच मागण्यांसाठी बेमुदत उपोषण पुकारले होते.मात्र केवळ आश्वासनावर या कर्मचाऱ्यांची बोलावन करण्यात आली.यावेळी स्थानिक आमदारांच्या मध्यस्तीने या उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले मात्र चार वर्ष उलटरी तरी प्रश्न मात्र सुटलेले नाहीत.