हेल्मेटचा वापर वाढला

By Admin | Updated: April 22, 2016 02:10 IST2016-04-22T02:10:22+5:302016-04-22T02:10:22+5:30

शहरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेकडून कडक करवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या कारवाईचा धसका दुचाकीस्वारांनी घेतला असल्यामुळे हेल्मेटचा वापर वाढला आहे.

Increased use of helmets | हेल्मेटचा वापर वाढला

हेल्मेटचा वापर वाढला

अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोली
शहरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेकडून कडक करवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या कारवाईचा धसका दुचाकीस्वारांनी घेतला असल्यामुळे हेल्मेटचा वापर वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर होणाऱ्या केसेसमध्ये घट झाली आहे. आगामी काळात मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली.
राज्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अनेक शहरात याबाबत अंमलबजावणी सुरू असून त्या दृष्टीने वाहनचालकांसाठी प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे. हेल्मेट घालणे हे दुचाकीस्वाराच्या फायद्याचे आहे. पनवेल शहरातही वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकी चालकांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब गाडे यांनी अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता कारवाई होत असल्याने हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Web Title: Increased use of helmets