शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

भाज्यांंची आवक वाढली, मागणी व पुरवठ्याचे गणित जुळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 2:46 AM

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून पालेभाज्या, गाजर, हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ५ ते १० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत.

- प्राची सोनवणे नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून पालेभाज्या, गाजर, हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ५ ते १० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत. पुढील कालावधीत भाज्या स्वस्त असतील, असा अंदाज घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. गुरुवारी घाऊक भाजीपाला बाजारात एकूण ६४० गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये कोबी, फ्लॉवर, गाजर, हिरवी मिरची तसेच पालेभाज्यांमध्ये पालक, शेपू, कोथिंबीर, मेथी, कांद्याची पात या भाज्या जास्त प्रमाणात बाजारात दाखल झाल्या आहेत.जोधपूर, इंदूरसह नाशिकमधील बाजारात गाजर दाखल होण्यास सुरुवात झाल्याने आवक वाढली आहे.तसेच हिरवी मिरची हैद्राबाद, कर्नाटक आणि फरसबी नाशिक, पुणे येथून दाखल होत आहे. तर नाशिक, पुणे भागातून हिरव्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पुढील कालावधीत पालेभाज्या आणि गाजर, कोबी, फ्लॉवर या भाज्यांचे दर कमी राहतील,असा अंदाज घाऊक व्यापाºयांनी व्यक्त केला. ही आवक अखेरीस कमी होणार असल्याची शक्यता देखील व्यापाºयांकडून वर्तविण्यात आली आहे. शाळेला सुट्ट्या सुरू झाल्या की मागणी कमी होणार अशी प्रतिक्रिया व्यापाºयांनी व्यक्त केली.गेल्या वर्षी पाऊस उशिराने सुरू झाला त्यामुळे उत्पादन लांबले आणि त्यामुळे उष्णतेमध्येही मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.जेवढी मागणी तेवढा पुरवठा असे गणित जुळून आले आहे. मात्र, उत्पादक भरडला जात असून, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याची खंत घाऊक भाजीपाला महासंघाचे सचिव प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. उत्पादनाचा खर्च वाढत असून, माल मात्र त्या दरात विकला गेला पाहिजे, तरच उत्पादकांचा खरा फायदा होईल. उत्पादन घेणे स्वस्त झाले तर नक्कीच शेतकºयांचा फायदा होईल.अधिक उत्पादनासाठी खत टाकण्यात आले. असे असले तरी, भाजीपाल्याचे दर कवडीमोल असल्याने लागवड खर्च निघणेही कठीण असल्याची प्रतिक्रि या शेतकरी विजय दुधे यांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात बाहेरील राज्यातून शेतमाल आल्याने दर घसरले. याचा फटका महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांना बसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.>गवार- २४०० ते ३४००कारले - १८०० ते २८००कोबी - ५०० ते ७००शिमला मिरची - १६०० ते २२००तोंडली - १५०० ते २०००वांगी - १००० ते १२००फरसबी - ३००० ते ३६००चवळी शेंग - १६०० ते २६००भेंडी - ३००० ते ३४००

टॅग्स :vegetableभाज्या