- नामदेव मोरे, नवी मुंबईदगडखाणींमुळे शहराच्या एका बाजूला असलेल्या डोंगर रांगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. धूलिकणांचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास किती होवून द्यायचा याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एक सुनियोजित शहर म्हणून देशभर ख्याती पसरली आहे. नवी मुंबईला दिवा ते दिवाळेपर्यंत विस्तीर्ण खाडीकिनारा तर दुसऱ्या बाजूला दिघा ते बेलापूरपर्यंत डोंगररांगा असा निसर्गाचा समृद्ध वारसा मिळाला आहे. परंतु विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. काही वर्षांपासून शहरातील प्रदूषण वाढत असून त्यामध्ये दगडखाणींचा मोठा वाटा आहे. मुंबई, नवी मुंबई परिसरातील रस्ते व इतर बांधकामांना खडी उपलब्ध व्हावी यासाठी एमआयडीसीत जवळपास २०९ दगडखाणी सुरू केल्या होता. यामधील अनेक खाणी बंद झाल्या असून आता ८० दगडखाणी सुरू आहेत. त्यांना ९६६१५१ चौरस मीटर क्षेत्रफळावर खाणकाम करण्यासाठी परवानगी दिली आहे. या सर्वांची मुदत २०१६ पर्यंत आहे. जवळपास चार दशके खाणकाम सुरू असून डोंगराचे अस्तित्व संपुष्टात येवू लागले आहे. डोंगरावरील वनराईही नाहीशी होवू लागली आहे.खाणीमुळे एमआयडीसीत धुळीचे साम्राज्य पसरत आहे. झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या व खाणीमध्ये काम करणाऱ्या २ लाखपेक्षा जास्त नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. अनेकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. क्षयरोगाचे प्रमाणही वाढले आहे. वेळेत खाणी बंद केल्या नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे. दगडखाणीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जवळपास १ लाख नागरिकांना रोजगार मिळाला आहे. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्या तरी १२ लाख शहरवासीयांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या समतोलासाठी दगडखाणींविषयी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या पर्यावरणविषयक अहवालामध्येही खाणीमुळे प्रदूषणात वाढ होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामुळे पुढीलवर्षी दगडखाणींचा परवाना संपल्यानंतर येथे व्यवसाय करणाऱ्यांना इतर ठिकाणी दगडखाणी उपलब्ध करून द्याव्या. दगडखाणमालक व कामगारांचे योग्य पुनर्वसन करून सर्वांना विश्वासात घेवून पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. दगडखाणीतून शासनाला प्रचंड महसूल मिळतो. खाणमालकही मोठ्याप्रमाणात आर्थिक कमाई करत आहेत. परंतु दगडखाण परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी मात्र कोणीही गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत. वृक्षारोपण करणे, मजुरांच्या आरोग्याच्या रक्षणाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. खाणींच्या जागेवर अतिक्रमण दगडखाण परिसरात शेकडो एकर जमीन आहे. या जमिनींवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हजारो झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. काही दगडखाण मालकांनी कामगारांसाठी झोपड्या बांधल्या आहेत. खाणी बंद झाल्या तरी त्यांची बांधकामे तशीच आहेत. यामुळे ज्या दगडखाणी बंद झाल्या आहेत. तेथील जमिनीवरील अतिक्रमण थांबविण्याचे आव्हान महापालिका, सिडको व एमआयडीसी प्रशासनासमोर उभे राहिले आहे. नाईक यांनी मांडली होती भूमिकाशहरातील दगडखाणींमुळे डोंगररांग नाहीशी होत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. आता दगडखाणी बंद करून दगडखाण मालकांना दुसऱ्या ठिकाणी पर्यायी खाणी उपलब्ध करून द्याव्या किंवा आर्थिक मोबदला द्यावा अशी भूमिका गणेश नाईक यांनी पालकमंत्री असताना व्यक्त केली होती. पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांची भूमिका योग्य होती. परंतु या विषयाचे विरोधकांनी राजकारण करून त्यांच्याविरोधात खाणमालक व कामगारांना भडकविण्याचे प्रयत्न झाले. यामुळे हा विषय मागे पडला. मतांच्या राजकारणामुळे आता याविषयी कोणी ठोस भूमिका घेत नसले तरी शहरवासीयांच्या आरोग्यासाठी आता खाणींविषयी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पर्यावरणासाठी पालिकेने सुचविलेल्या उपाययोजना - बंद दगडखाणींच्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे- मोकळ्याजागी वृक्षारोपण करणे- सुरू दगडखाणींच्या परिसरात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा राबविणे- बंद दगडखाणींच्या जागेवर भराव करून जमीन वापरण्यायोग्य करणे शहरात सुरू असलेल्या विभागनिहाय दगडखाणीविभागसंख्याखाणीचे क्षेत्र बोनसरी१७२४४५९२कुकशेत११११५४५०पावणे१४१५८६४०शिरवणे१०१०३१२५तुर्भे२८३४४३४४एकूण८०९६६१५१(चौ. मी.)
दगडखाणींमुळे प्रदूषणात वाढ
By admin | Updated: September 12, 2015 01:14 IST