शहरं
Join us  
Trending Stories
1
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
2
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
3
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
4
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
5
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
6
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
7
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
8
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
9
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
10
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
11
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
12
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
13
UTS वर लोकलचा पास काढणं झालं बंद! तुमच्याकडे असलेल्या जुन्या पासचं काय होणार? वाचा सविस्तर...
14
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
15
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
16
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
17
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
18
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
19
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
20
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधार मशिन बंद पडल्याने गर्भवतींची झाली गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:46 IST

पनवेल : पंतप्रधान मातृत्व वंदना योजना व जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील गर्भवती महिलांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.

मयूर तांबडे पनवेल : पंतप्रधान मातृत्व वंदना योजना व जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील गर्भवती महिलांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या या आधार कार्ड शिबिरासाठी शेकडो गर्भवती महिला उपस्थित होत्या. मात्र, दुपारीच आधार कार्डची मशिन बंद झाल्यामुळे महिलांना निराश होऊन घरी परत जावे लागते.पनवेल तालुक्यात हजारो नागरिकांची अद्यापही आधार कार्ड नोंदणी करणे बाकी आहे. महिलांचीही आधार कार्ड नोंदणी बाकी आहे. पंचायत समितीच्या कार्यालयात २२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत गर्भवती महिलांना मोफत आधार कार्ड काढून दिले जाणार होते. यासाठी तालुक्यातील १२७ गर्भवती महिला उपस्थित राहिल्या होत्या. महिलांच्या मोफत आधार कार्ड नोंदणीसाठी दोन मशिन उपलब्ध करण्यात येणार होत्या. प्रत्यक्षात मात्र एकच मशिन आणण्यात आली. त्यातच २५ ते २७ महिलांची आधार नोंदणी झाल्यानंतर मशिन अचानक बंद पडली. ती पुन्हा सुरूच झाली नसल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे महिलांना आधारविनाच परत घरी जावे लागले. तालुक्यातील गावागावांतून गर्भवती महिला पंचायत समितीच्या कार्यालयात आधार नोंदणीसाठी आल्या होत्या. काही महिला भाड्याने वाहन करून नोंदणीसाठी आल्या होत्या. मात्र, त्यांनाही निराश होऊन परतावे लागले. नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’ अर्थात आधार कार्ड हा महत्त्वाकांक्षी नोंदणी कार्यक्र म पनवेलमध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र, बहुतांशी ठिकाणी नोंदणी बंद झाल्याचे दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण भागात सद्यस्थितीत आधार कार्डची नोंदणी करणारे केंद्र नसल्यामुळे ज्यांची नोंदणी बाकी आहे, त्यांची स्थिती वाºयावर सोडून दिल्याप्रमाणे झाली आहे. बँकेत खाते उघडताना, गॅस सबसिडी मिळविण्यासाठी, पारपत्र मिळविताना, वाहनचालक परवाना मिळविताना अथवा तत्सम कामे करताना प्रत्येक वेळी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डाची गरज लागते. पंचायत समितीच्या कार्यालयात शुक्र वारी छोटेखानी कार्यक्र माचे आयोजन करत गर्भवती महिलांना आधार कार्ड प्रक्रि येत सहभागी होण्यासाठी बोलविण्यात आले होते. या आधार नोंदणी कार्यक्र माला गर्भवती महिलांनी चांगला प्रतिसाद दिला होता; परंतु ऐन वेळी मशिनच बंद पडल्याने उपस्थित महिलांची पुरती निराशा झाली.>तहसील कार्यालयात जाऊन दुसरी मशिन आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मशिन आलीच नाही. ३० महिलांची नोंदणी झाल्यानंतर मशिनच बंद पडली. पुन्हा एकदा आधार कार्ड नोंदणी घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- नागनाथ येमपल्ले,तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती