नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 13:54 IST2018-01-10T13:52:36+5:302018-01-10T13:54:44+5:30
जीएसटी बाबत आयकर विभागाच्या 12 अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिकेवर धाड टाकली आहे.

नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची धाड
नवी मुंबई - जीएसटीबाबत आयकर विभागाच्या 12 अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिकेवर धाड टाकली आहे. आयकर विभागानं काल सकाळी धाड टाकली होती. ठेकेदारांनी जीएसटी योग्य प्रकारे भरणा केला का याचीही तपासणी करण्यात आली. काल सकाळ पासून आज पहाटे पर्यंत तपास सुरू होता. महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे समजते.
काल सकाळी महापालिकेच्या अकाउंट्स विभाग, नगररचना विभाग आणि शहर अभियंता विभागावर धाडी घातल्या आहे. यावेळी 100 कोटींच्या वरील कामांच्या सर्व फायलींची तपासणी करण्यात आली. काल सकाळ पासून आज पहाटे पर्यंत तपास सुरू होता. महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारावर आहेत.