मराठा आंदोलनात तरूणाने दुचाकीचा केल रथ; चार दिवस दिंडीत सहभाग
By नामदेव मोरे | Updated: January 26, 2024 14:00 IST2024-01-26T13:59:21+5:302024-01-26T14:00:05+5:30
आंदोलनात वेधले सर्वांचे लक्ष

मराठा आंदोलनात तरूणाने दुचाकीचा केल रथ; चार दिवस दिंडीत सहभाग
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनात गोकूळ वेतार या तरूणाने त्याच्या मोटारसायकलचे रथामध्ये रूपांतर केले होते. चार दिवस आरक्षण दिंडीत तो सहभागी झाला होता.
गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळालेच पाहिले यासाठी आंदोलनामध्ये तरूण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. अनेक तरूणांनी कल्पकतेचा वापर केला असून सर्वांचे लक्ष वेधले होते. यामध्ये गोकूळ वेताळ या तरूणाचाही समावेश आहे. त्याने मोटारसायकलला चारही बाजूला आरक्षणाविषयी जागृती करणारे फलक लावले होते. मोटारसायकलला रथाचे स्वरूप दिले होते. त्याचा हा मोटारसायकल रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
सरकारने आरक्षण तत्काळ दिले पाहिजे. या लढ्यात आपलाही सक्रीय सहभाग असावा यासाठी चार दिवस दिंडीत सहभागी झालो आहे. यापुर्वीच्या लढ्यातही सहभागी घेतला होता व यापुढेही सक्रीय सहभागी होण्याचा ठाम निर्धारही त्याने व्यक्त केला.