शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी - पी. वेलरासू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 00:38 IST

पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

नवी मुंबई :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  64 हजार 222  मते वैध ठरली तर  3 हजार 422  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  32 हजार 112  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. 

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे 1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 7723) योगेश बालकदास गजभिये  :- 894) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 395) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष  :- 11 6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464 7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष  :- 26 8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37

पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Anil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक 2024