शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात सुधारगृहातील तरूणी गरोदर

By admin | Updated: July 15, 2015 23:33 IST

शहरातील शासकीय शांतीसदन महिला वस्तीगृहातील २१ वर्षाची तरूणी गरोदर राहिली असून विभागीय आयुक्त पोखरकर यांनी अश्लिल शब्दाचा वापर केल्याची तक्रार

उल्हासनगर : शहरातील शासकीय शांतीसदन महिला वस्तीगृहातील २१ वर्षाची तरूणी गरोदर राहिली असून विभागीय आयुक्त पोखरकर यांनी अश्लिल शब्दाचा वापर केल्याची तक्रार येथील महिलांनी केल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पिडित तरूणीला ठाणे येथील सामाजिक संस्थेकडे हलविले असून अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.उल्हासनगर कॅम्प नं-५, येथे हे वस्तीगृह असून तेथे अनैतिक धंद्यात पकडलेल्या मुली व महिलांना ठेवण्यात येते. भिंवडीत पकडलेल्या ब्रह्मदेश येथील २१ वर्षाच्या तरूणीला १९ जुलै २०१४ साली न्यायालयाच्या आदेशान्वये वस्तीगृहात ठेवण्यात आले होते. तसेच मायदेशी परत पाठविण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. सावत्र मेहुण्याने चांगल्या कामाचे आमिष दाखवून या तरुणीला मुंबईला आणून भिंवडी येथील आशा नावाच्या महिलेला विकले होते. त्यावेळी तिची ओळख अब्दुला नावाच्या तरूणासोबत होऊन नंतर त्यांनी लग्न केले. भिवंडी पोलिसांनी या तरूणीला एका प्रकरणात ताब्यात घेतल्यावर ती ब्रह्मदेशची रहिवासी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने उल्हासनगर येथील महिला सुधारगृहात ठेवण्याचे व मायदेशी पाठविण्याचे आदेश दिले. ही तरूणी गरोदर असल्याची माहिती विभागीय आयुक्त बी.टी.पोखरकर, जिल्हा बालविकास अधिकारी शशिकांत चव्हाण, व जाधव यांना मिळाल्यावर त्यांनी रविवारी वस्तीगृहातील मुलीची चौकशी केली. पोखरकर यांनी एकेका मुलीची चौकशी करून अश्लिल भाषेचा वापर केल्याच्या तक्रारी काही महिलांनी अधिक्षिका नंदा घोडेराव यांच्याकडे केल्या आहेत. हे आरोप पोखरकर यांनी फेटाळले आहे. पिडीत तरूणीचे प्रियकराशी वस्तीगृहात अथवा बाहेर संबध आल्याने ती गरोदर राहिल्याची चर्चा आहे. तिने याची कबूली दिल्याची माहिती अधिक्षका घोडेवार यांनी दिली. विभागीय आयुक्तांनी हा अहवाल विभागाच्या प्रधान सचिवाला पाठविला असून अश्लील भाषेचा वापर केला नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे. (प्रतिनिधी)