‘स्वच्छ महाराष्ट्र’ची अंमलबजावणी
By Admin | Updated: July 23, 2015 03:36 IST2015-07-23T03:36:01+5:302015-07-23T03:36:01+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात प्रथमच बांधण्यात आलेल्या बेलापूर प्रभाग १०७, सेक्टर १५ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन बुधवारी

‘स्वच्छ महाराष्ट्र’ची अंमलबजावणी
नवी मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात प्रथमच बांधण्यात आलेल्या बेलापूर प्रभाग १०७, सेक्टर १५ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन बुधवारी आयुक्त दिनेश वाघमारे आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान सुरू केले आहे. फडणवीस यांच्या वाढदिवशीच या स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
मंदा म्हात्रे आपला वर्षभराचा दोन कोटींचा आमदार निधी देऊन ३० शौचालयांची निर्मिती करणार आहेत. ‘नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात हा प्रकल्प राबविला जात असल्याने ही कौतुकास्पद बाब आहे,’ या शब्दांत वाघमारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, उपायुक्त बाबासाहेब राजळे, डॉ. राजेश पाटील, शैलजा पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)