शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कामोठ्यातून निघतोय हुक्क्याचा ‘धूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:26 IST

खारघरनंतर आता कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरनी जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींची गर्दी वाढत असून, पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : खारघरनंतर आता कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरनी जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींची गर्दी वाढत असून, पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे तरुण पिढी बिघडत चालल्याची भीती कामोठेकरांकडून व्यक्त होत आहे. याविरोधात नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या नेतृत्वाखाली रहिवासी एकटवले असून, हुक्का पार्लर हद्दपार करण्याची मागणी केली आहे.कामोठे वसाहतीत पायाभूत सुविधांचा वानवा असली तरी बार, वाइन व बीअर शॉपची संख्या कमी नाही. बीअर शॉपीसमोर बिनधास्त मद्यपी बीअर रिचवतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. गेल्या एक-दोन वर्षांपासून खारघरमधील हुक्का पार्लरचे लोन कामोठे वसाहतीत पोहोचले आहे. सुरुवातीला सेक्टर-३४ येथे रिद्धी- सिद्धी इमारतीतील दोन गाळ्यांत हुक्का पार्लर सुरू करण्यात आले. पूर्वी हे पार्लर खारघर येथे होते. मात्र, ते बंद केल्याने त्यांनी कामोठे वसाहतीत बस्तान बांधले. येथे खारघरहून महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येतात. सायंकाळी हे पार्लर हाउसफुल्ल होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यानंतर याच सेक्टरमध्ये ऋ षिकेश सोसायटीत १५,१६ आणि १७ तीन गाळे एकत्रित करून दुसरे पार्लर सुरू करण्यात आले. येथेही मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. संबंधित सोसायटीतील रहिवाशांनी या हुक्का पार्लरला विरोध दर्शवला आहे; परंतु त्याविरोधात ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आणखी दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरू करण्यात आले आहेत. तरुण पिढीला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणाºया या हुक्का पार्लरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यावर कारवाईची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.