अपहृत चिमुरड्याची सुखरुप सुटका

By Admin | Updated: December 31, 2014 22:23 IST2014-12-31T22:23:29+5:302014-12-31T22:23:29+5:30

अपहरण झालेल्या एका ६ वर्षांच्या मुलाची गुन्हे प्रकटीकरण ११ शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे.

Hijacked kidney rescues safely | अपहृत चिमुरड्याची सुखरुप सुटका

अपहृत चिमुरड्याची सुखरुप सुटका

मालाड : मालवणी परिसरातील गेट नंबर ७ येथे सोमवारी संध्याकाळी अपहरण झालेल्या एका ६ वर्षांच्या मुलाची गुन्हे प्रकटीकरण ११ शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे.
अपहरणकर्ता हा मुलाच्या घरी कामाला होता. मुलाचे वडील कॉन्टॅ्रक्टर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा मोह आरोपीला आवरला नाही आणि त्याची नियत फिरली. ५ दिवसांपूर्वी त्यांच्या सहा वर्षीय मुलाच्या अपहरणाचा कट रचला. ५ दिवसांपूर्वी आरोपी व त्याच्या इतर चार साथीदारांनी गोरेगाव प्रेमनगर परिसरात भाड्याने एक रूम घेतली. सोमवारी मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपी आपल्याकडे पैसे आहेत, तुला चॉकलेट देतो, असे सांगून मुलाला सायकलवरून घेऊन गेला. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न परतल्याने मुलाच्या घरच्यांनी मालवणी पोलिसांना कळविले होते. त्यानंतर मालवणी पोलीस आणि गुन्हे शाखा ११ने समांतर तपास सुरू केला.
रात्री १०च्या दरम्यान अपहरणकर्त्यांचा पहिला फोन आला. त्याने मुलाच्या सुटकेसाठी ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलाच्या कुटुंबाने मंगळवार सकाळपर्यंत ३५ लाख रुपयांची जमवाजमव केली. मंगळवारी सकाळी १० वाजता परत अपहरणकर्त्यांचा फोन आला आणि रक्कम तयारी झाली का? हा प्रश्न विचारत दुपारी १२ वाजता भेटण्यास सांगितले.
अपहरणकर्त्याचा फोन क्रमांक पोलिसांनी ट्रेस केला. दुपारी मुलाचे वडील ३५ लाख रुपये घेऊन जात असताना, गुन्ह्यातील एका आरोपीला मालवणी अंबूजवाडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाला गोरेगाव पश्चिम येथील झोपडपट्टीतून सुखरुप ताब्यात घेण्यात आले. (वार्ताहर)

च्सोमवारी मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपी आपल्याकडे पैसे आहेत, तुला चॉकलेट देतो, असे सांगून मुलाला सायकलवरून घेऊन गेला.

च्बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न परतल्याने मुलाच्या घरच्यांनी मालवणी पोलिसांना कळविले होते. त्यानंतर मालवणी पोलीस आणि गुन्हे शाखा ११ने समांतर तपास सुरू केला.

Web Title: Hijacked kidney rescues safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.