शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

लोकबिरादरीतूनच हेमलकसाचा विकास शक्य - डॉ. प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:21 AM

कार्यकर्त्यांमुळेच हेमलकसा प्रकल्पाचा विकास साधण शक्य झाले असून यामध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे अशा शब्दात मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ . प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाच्या यशाची माहिती दिली.

नवी मुंबई : कार्यकर्त्यांमुळेच हेमलकसा प्रकल्पाचा विकास साधण शक्य झाले असून यामध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे अशा शब्दात मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ . प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाच्या यशाची माहिती दिली. मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या साहित्य मंदिर इमारतीवर वीज निर्मितीकरिता सौरऊर्जा प्रकल्प बांधण्यात आला असून या प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रकाश बाबा आमटे व मंदाकिनी आमटे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. आमटे यांनी हेमलकसा प्रकल्पाची माहिती दिली.हेमलकसा येथील प्रकल्पावर काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देत शक्य तोपरी मदत केल्याची माहिती डॉ. आमटे यांनी दिली. प्रकल्पा बाबतचे अनुभव , त्यासंबंधीत आठवणी, प्रकल्पात सहभागी कार्यकर्ते यामाध्यमातून डॉ आमटे यांचा जीवनपट याठिकाणी उलगडण्यात आला. आदिवासींची बोलीभाषा अवगत नसताना त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कामाला केलेली सुरु वात याबाबताचे निवडक अनुभव याठिकाणी सांगण्यात आले. हेमलकसापासून पंचवीस किमी अंतरावर असलेल्या मेलगुंडा या गावात शाळा कशी सुरु केली याविषयीदेखील माहिती यावेळी दिली. तिथल्या आदिवासींना मराठी आण िइंग्रजी या दोन्ही भाषा परदेशीच आहेत. त्यामुळे त्यांना जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मग तिथे इंगर्जी शिकवायला सुरु वात केली त्यामुळे आता तिथली आदिवासी मुले इंगर्जी बोलतांना पहायला मिळतील हे त्यांनी अभिमानाने सांगितले. पहिल्या शाळेतील मुले आता डॉक्टर ,वकील झाल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्र माला महापौर जयवंत सुतार , डॉ. मंदाकिनी आमटे, मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, आदी मान्यवर तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या मंडळातर्फे गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून साहित्य, संस्कृती व कलेच्या क्षेत्रात विविध उपक्र म केले जातात. या उपक्र मांबरोबर सामाजिक बांधिलकी जपून मेडिकल्स कॅम्प, ग्रंथ प्रदर्शने, आदिवासी नागरिकांना कपडे वाटप, रेनवॉटर हार्वेस्टिंग, या सारखे उपक्र म देखील सातत्याने सुरु आहेत. अशी माहिती सुभाष कुलकर्णी यांनी यावेळी दिली . वाशी येथील संस्थेच्या इमारतीचा संपूर्ण वीज पुरवठा शनिवारी सौरउर्जेवर (नेट मीटरिंग पद्धतीने) सुरु करण्यात आला. यामध्ये इमारतीमधील साठ टॅन वातानुकूलित यंत्रणा आण िविजेची सर्व उपकरणे चालवली जाणार आहेत. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. याबबत महापौर जयवंत सूतार यांनीही समाधान व्यक्त केल.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई