मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सलग दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईला झोडपले
By नामदेव मोरे | Updated: September 8, 2022 18:50 IST2022-09-08T18:49:33+5:302022-09-08T18:50:24+5:30
मॅफ्को मार्केटसह तुर्भेमध्ये पाणी साचले

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सलग दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईला झोडपले
नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबईला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोपडपले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील मॅफ्को मार्केटसह तुर्भे परिसरातील रस्त्यांवर एक फुट पाणी साचले होते.पावसामुळे दोन ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात बुधवारी सायंकाळी साडेचार ते साडेआठ दरम्यान जवळपास ५५ मिमि पाऊस पडला. गुरूवारीही सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. मॅफ्को मार्केट परिसरात रोडवर पाणी साचले होते. तुर्भे परिसरात एक ते दिड फूटापर्यंत पाणी साचले होते. सायन - पनवेल महामार्गावरील पाणी जोडरस्त्यावर आल्याने तेथील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ढगांमुळे सायंकाळी पाच वाजताच महामार्गावर अंधाराची स्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे ऐरोलीत एक वृक्ष कोसळला आहे.
सायंकाळी पाच पर्यंत पावसाची नोंद
बेलापूर ४३
नेरूळ ५४
वाशी ४३
कोपरखैरणे ३६
ऐरोली ४७
दिघा ३७