शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आरोग्य विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 23:48 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही.

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा शहरवासीयांना फटका बसत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून, ठेकेदारावर कारवाई करून नवीन निविदा काढाव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे.डासांची समस्या गंभीर झाली आहे. त्रस्त झालेले नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करू लागले आहेत. नगरसेवक ठेकेदार व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून औषध व धूर फवारणीमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत; परंतु ठेकेदारांकडून समाधानकारक कामे केली जात नाहीत. औषध पुरेशा प्रमाणात फवारले जात नाही. अनेक दिवसांपासून औषध तुटवडा निर्माण झाला असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे; पण प्रशासनही ठेकेदाराला पाठीशी घालत असल्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये अधिकाºयांना धारेवर धरले. औषध फवारणीसाठी कोणती औषधे वापरली जातात, घरामध्ये व घराच्या बाहेर कोणती औषध फवारणी करायची असते, याचा तपशील देण्यात यावा. डास मारण्यासाठीच्या औषधांची गुणवत्ता नियमित तपासली जाते का? याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. यापूर्वी महानगरपालिका औषध विकत घेऊन ते ठेकेदारांना पुरवत होते; परंतु नवीन निविदा काढल्यानंतर औषध खरेदीची जबाबदारीही ठेकेदारावर सोपवली आहे. ठेकेदार औषधांच्या ऐवजी डिझेलचा धूर सर्वत्र सोडत असल्याची टीकाही नगरसेवकांनी सभेत केली. नागरिक त्रस्त झाले असताना अधिकारी व ठेकेदार मात्र निवांत आहेत. डासांचे प्रमाण नियंत्रणामध्ये आणता येत नसेल व हिवाळ्यात डासांच्या प्रमाणात वाढ होतेच, असा प्रशासनाचा दावा असेल तर मग औषध फवारणीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च का व्यर्थ घालवला जात आहे, अशी टीकाही करण्यात आली.महापालिका मलेरिया व डेंग्यूचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याशिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करणाºया ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. ठेका रद्द करून नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. आरोग्य अधिकारी दयानंद कटके यांनी या विषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हिवाळ्यात प्रत्येक वर्षी डासांचे प्रमाण वाढत असते. पालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी डासांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आल्या असल्याची माहिती दिली. औषधे खरेदीची जबाबदारी ठेकेदारावर का देण्यात आली व या विषयीची माहिती पुढील सभेत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.।औषधांऐवजी डिझेलचा धूर केला जात असण्याची शक्यताऔषधे बदलण्याची आवश्यकताठेकेदाराची पात्रता तपासणे गरजेचे असल्याचे मतअधिकारी, ठेकेदारांची मिलीभगत असल्याचा आरोप>डास नियंत्रणासाठी वापरण्यात येणाºया औषधांची गुणवत्ता कोठे तपासली जाते. औषधांऐवजी डिझेलचा धूर केला जात असण्याची शक्यता असून याची चौकशी करण्यात यावी.- देविदास हांडे-पाटील,नगरसेवक, प्रभाग ४२शहरात औषध फवारणी केली जाते; परंतु त्याचा डासांवर काहीही परिणाम होताना दिसत नाही, औषधे बदलण्याची आवश्यकता आहे.- डॉ. जयाजी नाथ,नगरसेवक, प्रभाग १०४>ज्या ठेकेदाराला काम दिले त्याची पात्रता तपासणे गरजेचे आहे. या विषयी निविदा कधी काढल्या हेही आठवत नाही. आयुक्तांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा निविदा काढाव्या व या कामात भागीदार कोण आहेत, याचाही शोध घ्यावा.- नामदेव भगत,नगरसेवक, प्रभाग ९३शहरात डासांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, या समस्येकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांना खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे का? फवारणी करण्यात आलेल्या औषधांचा तपासणी अहवाल सादर करावा.- दिव्या गायकवाड,नगरसेविका, प्रभाग ६४

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका