शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पोलिसांकरिता आरोग्य तपासणी

By admin | Updated: January 28, 2017 03:04 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घणसोली येथे पोलिसांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घणसोली येथे पोलिसांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी २०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:च्या आरोग्याची तपासणी करून घेतली.कोपरखैरणे पोलिसांच्या वतीने घणसोली पोलीस चौकीलगतच्या आवारात हे शिबिर भरवण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याशिवाय डोळे, दंत व मुख रोगांचीही तपासणी करण्यात आली. बहुतांश पोलिसांना तपासकामामुळे स्वत:च्या आहारावर नियंत्रण ठेवता येत नाही, तर भुकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही जण मिळेल ते पदार्थ खाल्ले जातात. त्याशिवाय मावा, पान यांचेही व्यसन असल्यामुळे दात खराब होवून तोंडाचे आजारही होण्याची शक्यता असते. काहींना धूळ अथवा धुराच्या त्रासामुळे डोळ्यांचे आजार होवून त्यांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. परिणामी अनेक पोलिसांना उतारवयात प्रकृतीच्या अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी हे शिबिर भरवले होते. याप्रसंगी डॉ. राहुल ढाणे, डॉ. प्रशांत थोरात यांच्या वैद्यकीय पथकाने पोलिसांची मोफत तपासणी केली. दरम्यान, वर्षभरात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिसांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)