पोलीस भरतीकरिता मुख्यालय सज्ज
By Admin | Updated: March 22, 2017 01:41 IST2017-03-22T01:41:27+5:302017-03-22T01:41:27+5:30
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १५३ जागांकरिता बुधवारपासून भरती प्रक्रि येला सुरुवात होणार आहे. यासाठी जवळपास पाचशे

पोलीस भरतीकरिता मुख्यालय सज्ज
कळंबोली : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १५३ जागांकरिता बुधवारपासून भरती प्रक्रि येला सुरुवात होणार आहे. यासाठी जवळपास पाचशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दररोज एक हजार उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. ही भरती अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार असल्याने त्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे, तसेस व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली असल्याचे मुख्यालयातून सांगण्यात आले.
नवी मुंबई महापालिका क्षेत्र, पनवेल आणि उरणचा समावेश असलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पाच हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी त्यामध्ये भर पडत असल्याने हा आकडा वाढत आहे. यंदा १५३ पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती होणार आहे. रोडपाली येथील पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रि या पार पडणार असल्याने त्याकरिता गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी सुरू आहे. धावपट्टी, गोळा फेक, लांब उडीकरिता स्वतंत्र मैदाने तयार करण्यात आली आहेत.
भरती प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी याबाबत आढावा घेतला आहे. भरती प्रक्रि येबाबत इत्थंभूत माहिती देण्याकरिता सोमवारी मुख्यालयात विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.