शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ‘त्यांनी’ धरली कास

By admin | Updated: September 5, 2015 03:10 IST

नेरुळ येथे राहणाऱ्या आर. राधाकृष्णन यांनी शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी श्रीराम राधाकृष्णन ट्रस्टची सुरुवात केली

प्राची सोनवणे ,नवी मुंबईनेरुळ येथे राहणाऱ्या आर. राधाकृष्णन यांनी शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी श्रीराम राधाकृष्णन ट्रस्टची सुरुवात केली. यंदा बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणासाठी ८०हून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य केले आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या वेतनाचा मोबदला गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरतात. आर. राधाकृष्णन यांच्या मुलगा श्रीराम हा अत्यंत हुशार, तीक्ष्ण बुध्दीमत्तेचा होता. २०१२ साली टिबीने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलाच्या आठवणी कायमस्वरुपी टिकून रहाव्या तसेच शहरातील गरजू विद्यार्थ्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये या करिता श्रीराम राधेकृष्णन ट्रस्टची स्थापना केली. शिक्षणाची इच्छा असूनही आर्थिदृष्ट्या सक्षम नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत मदत केली जाते. आर राधाकृष्णन यांनी ठाणे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीही बालवाडी सुरु केली आहे. या संस्थेच्या वतीने आॅगस्ट महिन्यापर्यंत ३ लाख, ९८ हजार, १३५ रुपयांची मदत करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनियरींग, वाणिज्य, विज्ञान, कला, बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वर्षभरात ६ लाखाहून अधिक रुपयांची मदत विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे कित्येक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करत असून त्यांच्या शिक्षणाची वाट मोकळी झाली आहे.