शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
3
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
7
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
8
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
9
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
10
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
11
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
12
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
13
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
14
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
15
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
16
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
17
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
18
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
19
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
20
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 07:42 IST

यामुळे जनतेच्या समस्यांचा सर्वच पक्षांना जागावाटपाच्या स्वार्थात विसर पडल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.  जागावाटपाच्या वादांमध्ये सर्व राजकीय पक्ष व्यस्त होते.

नारायण जाधव -

नवी मुंबई : निवडणुकीत कोणत्या विकास कामांना प्राधान्य देणार, कोणते प्रकल्प आणणार आणि कोणत्या समस्या सोडवणार हे सांगून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष जाहीरनाम्यांचा आधार घेतात; मात्र या पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण होऊनदेखील मुंबई महानगर प्रदेशातील नऊ महापालिकांत एकाही पक्षाने किंवा महायुती-महाविकास आघाडीने त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध केलेले नाहीत. 

यामुळे जनतेच्या समस्यांचा सर्वच पक्षांना जागावाटपाच्या स्वार्थात विसर पडल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.  जागावाटपाच्या वादांमध्ये सर्व राजकीय पक्ष व्यस्त होते. ही प्रक्रिया संपून आता सर्व पक्षांनी उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या छाननीनंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे; मात्र यात कोणते मुद्दे घेऊन पक्ष प्रचार करणार याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.

हे मुद्दे येतील काय?पाणीटंचाई, वाहतूककोंडी, तोकडी आराेग्य व्यवस्था, फेरीवाले, सार्वजनिक वाहतूक सुविधेसह अनधिकृत बांधकामे, प्रदूषण, या समस्या सर्वत्र आहेत. वायू प्रदूषण, खड्डे, होर्डिंगवरून न्यायालयाने सरकार आणि पालिकांना धारेवर धरले होते. हे मुद्दे तरी वचननाम्यात उमटतील काय, असा प्रश्न केला जात आहे.

विकासाचा अर्थ नागरिकांच्या आनंदात वाढ करणे हादेखील असल्याने सर्वच पक्ष हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत का, प्रचार मोहिमेत कोणते मुद्दे मांडले जातील याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parties forget manifestos in seat-sharing greed for municipal elections?

Web Summary : Parties contesting municipal elections in Mumbai Metropolitan Region haven't released manifestos. Focus remains on seat-sharing, neglecting public issues like water scarcity and traffic. Citizens await parties' promises on addressing concerns and enhancing happiness index.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026Politicsराजकारण