शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

घणसोलीत अनधिकृत इमारतींवर हातोडा, पालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:07 AM

घणसोली गावातील दोन अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज दुपारी कारवाई केली. या इमारतींना महापालिकेच्या वतीने दोनदा नोटिसा बजावल्या होत्या.

नवी मुंबई : घणसोली गावातील दोन अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज दुपारी कारवाई केली. या इमारतींना महापालिकेच्या वतीने दोनदा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र नोटिसीला उत्तर न देण्यात आल्याने धडक कारवाई करून बांधकाम पाडले होते. अलीकडेच २७ जून रोजी घणसोली विभागातील ११ अनधिकृत बांधकामे आणि दोन मोबाइल टॉवर्सवर रबाले पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यानुसार एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असताना त्यात कारवाई केलेल्या दोन इमारतींचा समावेश आहे.महापालिका आयुक्त एन.रामास्वामी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त मोहन डगावकर, उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली विभागाचे सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. गोठीवली खदान तलावाजवळ जागा मालक जितुसिंग यांचे आरसीसी फुटिंगचे चालू बांधकाम आणि घणसोली गावातील महादेव वाडी येथील जमीन मालक अवतारसिंग मेहरा आणि बिल्डर विकास शांताराम चव्हाण यांच्या तीन मजली इमारतीवर पालिकेच्या अतिक्र मण विभागाने हातोडा मारून कारवाई केली. या कारवाईला ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होणार होता. मात्र घटनास्थळी रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजमहेंद्र वाळदकर उपस्थित असल्यामुळे कारवाईला वेग आल्याने इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही अनधिकृत इमारतींच्या मालक आणि बिल्डरांवर पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईला अडथळा येऊ नये म्हणून मोकळ्या जागेतील ब्रेकर मशीन,तसेच २५ मजूर, सुरक्षा रक्षक,एक जेसीबी आणि दोन ट्रक असा फौजफाटा उपस्थित होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई