गुजरातची ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहचली; ४५ मेट्रीक टन ऑक्सिजनची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 01:45 PM2021-04-26T13:45:35+5:302021-04-26T13:45:43+5:30

दोन टॅंकर, मुंबई तर एक टॅंकर पुण्याला पाठविणार. महाराष्ट्रातील ऑक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी राज्य शासनाकडून रेल्वेच्या मदतीने सुलभ प्रवासासाठी  ग्रीन काॅरीडोरचा उपयोग करत  इतर राज्यातून ऑक्सिजन आनले जात आहेत.

Gujarat's Oxygen Express reaches Kalamboli; Addition of 45 metric tons of oxygen | गुजरातची ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहचली; ४५ मेट्रीक टन ऑक्सिजनची भर

गुजरातची ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहचली; ४५ मेट्रीक टन ऑक्सिजनची भर

Next

- अरुणकुमार मेहत्रे, 

कळंबोली : गुजरातहुन आलेली ऑक्सिजन एक्सप्रेस, सोमवारी  साडे आकरा वाजता कळंबोली रेल्वे मालधक्क्यावर पोहचली . रविवारी संध्याकाळी ५ वाजता  गुजरात जामनगर ( हापा ) येथून ऑक्सिजन एक्सप्रेसने तीन टॅंकर भरुन प्राण वायु घेऊन  रवाना झाली होती. तीन टॅंकरमधून ४५ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे. ते पुणेसाठी एक तर मुंबईसाठी दोन टॅंकर वितरित केले जाणार आहे. 

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी राज्य शासनाकडून रेल्वेच्या मदतीने सुलभ प्रवासासाठी  ग्रीन काॅरीडोरचा उपयोग करत  इतर राज्यातून ऑक्सिजन आनले जात आहेत. त्यानुसार कळंबोली येथे रेल्वे प्रशासनाकडून विशेष ट्रॅक तयार करण्यात आला आहे.  गुजरात येथील हापा ऑक्सिजन प्लांट मधून  रविवारी तीन ऑक्सिजन टॅंकर मुंबईसाठी रवाना झाले. १९ तासाचा प्रवास पूर्ण करुन ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोली रेल्वे मालधक्का येथे साडे अकरा वाजता पोहचली. ऑक्सिजन टॅंकर रेल्वे बोगीवरुन उरवण्यात आले आहे.  

पुणे साठी १ टॅंकर तर मुंबई साठी २ असे महामार्गाने रवाना होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. हे वितरण अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या तीन टँकरच्या माध्यातून  ४५ मेट्रीक टन महाराष्ट्रात ऑक्सिजनची भर पडली आहे. या आगोदर कळंबोली रेल्वे मालधक्का येथून १९ एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथे ऑक्सिजनसाठी रेल्वे रवाना झाली होती. ही मोहीम यशस्वी झाली. त्यानुसार नागपूर व नाशिकसाठी ७ टॅंकरद्वारे १०५ मेट्रीक टन प्राणवायू मिळाला. रेल्वे कडून इतर राज्यातून ऑक्सिजन एक्सप्रेस चालवत महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणले जात आहेत.

Web Title: Gujarat's Oxygen Express reaches Kalamboli; Addition of 45 metric tons of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.