Greetings to Bank staff of dr babasaheb ambedkar | बँक कर्मचाऱ्यांचे महामानवाला अभिवादन
बँक कर्मचाऱ्यांचे महामानवाला अभिवादन

नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाशी शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. या वेळी बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल दत्ता राजे, उप प्रादेशिक व्यवस्थापक राजेंद्र बोरसे, गोपिचंद पाटेकर, निर्मला खोपकर, भावना गवळी आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उपस्थितांनी महामानवाला अभिवादन केले.
बँकेच्या मुंबई येथील कार्यालयातही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या वेळी बँकेचे महाप्रबंधक विजय कांबळे, उपमहाप्रबंधक

सुनीता भोसले, एम्प्लॉइज युनियनचे सचिव अरविंद मोरे आदीनी बाबासाहेबांनी दीनदुर्बल समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती देत आजच्या तरुणांनी डॉ. आंबेडकरांची शिकवण आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.

Web Title: Greetings to Bank staff of dr babasaheb ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.