महिला सुरक्षेबाबत सरकार असंवेदनशील; चित्रा वाघ यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:49 IST2020-08-11T01:49:36+5:302020-08-11T01:49:41+5:30
वाशीतील कोविड केअर सेंटरची केली पाहणी

महिला सुरक्षेबाबत सरकार असंवेदनशील; चित्रा वाघ यांचा आरोप
नवी मुंबई : कोरोना संसर्गाच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांत राज्याच्या विविध जिल्ह्यांत अशा प्रकारचे अमानुष्य प्रकार घडले आहे. काही ठिकाणी विलगीकरण केंद्रात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलांवरही अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांबाबत राज्य सरकारकडून कोणतेही कारवाई होताना दिसत नाही. यातून महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार किती संवेदनशील आहे, हे दिसून येते, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.
कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाºया कोरोनाबाधित महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोविड केअर सेंटरमध्ये महिला रुग्णांसाठी असलेल्या सोईसुविधा व उपचार पद्धतीचा चित्रा वाघ यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. कोरोनाच्या अगोदर आणि आता कोरोनामध्ये महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने दिशा कायदा आणण्याचे आश्वासन फेब्रुवारी महिन्यात दिले होते. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. मुळात सरकार कोणाचेही असो, महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड करता कामा नये, असे स्पष्ट करून महिला सुरक्षिततेच्या प्रश्नांवर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन यावेळी चित्रा वाघ यांनी केले आहे. कोविड केंद्रात उपचार घेणाºया कोरोनाग्रस्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस नियमावली असायला हवी असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अत्याचार करणाºयास कठोर शिक्षा व्हावी
कोविड केंद्रात उपचार घेणाºया कोरोनाग्रस्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस नियमावली असायला हवी. कोरोनाग्रस्त महिलेवर अत्याचार करणाºयाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर, संबंधित उपचार घेत असलेल्या कोविड सेंटरच्या प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी. कारण कोरोनाविरुध्दची लढाई कधी संपेल, हे सांगता येत नाही, परंतु महिलांवर अत्याचार करणारी प्रवृत्ती संपायला हवी, असे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त
केले आहे.