शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

"नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाही तर दि. बा. पाटलांचे नाव द्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 8:06 AM

navi mumbai airport : यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देशिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर याला मनसेने विरोध केला आहे.

नवी मुंबई : एकीकडे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरू असताना आता नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. या विमानतळाला रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि. बा.  पाटील यांचे नाव द्या, अशी मागणी मनसेने केली आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर याला मनसेने विरोध केला आहे. नवी मुंबईतील पनवेलमध्ये उभे राहत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेने पत्रकार परिषद घेत केली आहे. रायगड आणि नवी मुंबई मनसेकडून ही मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील एखादया भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे. मात्र, लोकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी केली आहे. तसेच, दि. बा. पाटील यांचे नाव द्यायची मागणी असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करत जे राजकारण केले आहे, ते निंदनीय आहे, असेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरूच आहे. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर काँग्रेस नेत्यांचे अधिक प्रेम आणि श्रद्धा असणार, याची मला खात्री आहे, असे सांगून भाजपचे कान टोचले. तर २६ जानेवारीपूर्वी हे नामांतर केले नाही, तर आंदोलन करणार असल्याची भूमिका मनसेने घेतली. 

नामांतराचा प्रस्ताव दुय्यम : अशोक चव्हाणऔरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्याबाबत सरकारकडे कुठलाच प्रस्ताव नाही. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली.तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह हे राहणारच; परंतु सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसार हे सरकार चालविले जात आहे, असे सांगून सर्व आलबेल असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले. 

अहमदनगरचेही नाव ‘अंबिकानगर’ कराऔरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचे नावही ‘अंबिकानगर’ करावे, अशी मागणी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. मराठा ठोक क्रांती मोर्चाचे आंदोलन औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये जोरदार आंदोलन केले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMNSमनसेShiv SenaशिवसेनाAirportविमानतळ