शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या!, पनवेल तहसीलवर सेनेचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:59 AM

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, पीक विम्याची रक्कम, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व संपूर्ण कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी

पनवेल : अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, पीक विम्याची रक्कम, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व संपूर्ण कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी पनवेल तहसील कार्यालयावर शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी मोर्चा काढला व पनवेल तहसीलदारांना निवेदन दिले.राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. राज्यपालांनी तुटपुंजी मदत जाहीर करू शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप शिवसेनेने आपल्या निवेदनात केलाआहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. याचा सामना करण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.पनवेल तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाºयांमार्फत नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संबंधित सर्वेक्षणात वेळ वाया न घालवता शेतकºयांना नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती घोषित करून हेक्टरी २५ हजार रुपये तसेच मच्छिमारांना नवीन बोटी बांधण्यास आर्थिक मदत म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात येण्याची मागणी यावेळी करण्यात आली.जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी, सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण राज्यात मोर्चे काढण्यात आले आहेत. त्यादृष्टीने पनवेलमध्ये सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा सल्लागार बबन पाटील, तालुका संघटक भरत पाटील, दीपक निकम, गुरुनाथ पाटील आदी उपस्थित होते.शेतकरी, मच्छीमारांची उरण तहसील कार्यालयावर धडकअवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम, संपूर्ण कर्जमाफी, अंतर्गत शेतक-यांना तातडीने मदत मिळावी, पिकांना व फळबागांना हेक्टरी २५०००/- रुपये तसेच मच्छीमारांनाही नुकसान भरपाईसह नवीन बोटी बांधण्यास आर्थिक मदत म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी उरण तहसील कार्यालयावर सेनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात बहुसंखेने उरण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक बहुसंख्येने सहभागी होते.२अवकाळी पावसामुळे उरणमध्ये हजारो शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे मासेमारी संकटात आली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांना लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात उपजिल्हाप्रमुख नरेश राहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख जे.पी.म्हात्रे, तालुका संघटक बी.एन.डाकी, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य हिराजी घरत, शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, जिल्हा प्रमुख रमेश म्हात्रे, उरण तालुका महिला संघटक भावना म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.रायगडमधील आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नपनवेल तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. मोर्चात सत्तास्थापनेच्या राजकारणावरच चर्चा सुरू होती. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत रायगडमधील आमदारांना गळ टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बबन पाटील यांनी केला.आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्याशी रवींद्र्र चव्हाण यांनी संपर्कसाधल्याचे प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी या वेळी केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी