शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विकृत व्यक्तीकडून तरुणीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न; नवी मुंबईतील स्टेशनवरचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 10:20 IST

महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर एका विकृतानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

नवी मुंबई - महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर एका विकृतानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या विकृतानं भर स्थानकात या तरुणीचं जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीला तरुणीनं हटकल्यानंतर त्यानं तिथून पळ काढला. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी या विकृताच्या काही वेळातच मुसक्या आवळल्या.  आरोपी हा 43 वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. 

नरेश के जोशी असे या आरोपीचे नाव आहे. तरुणीनं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाशी लोहमार्ग पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. आरोपीला वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 20 वर्षांची असलेली तरुणी ही तुर्भे येथील रहिवासी असून ती गुरुवारी ( 22 फेब्रुवारी ) सकाळी घणसोलीच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी स्थानकात लोकलची वाट पाहत उभी राहिली होती. यावेळी स्टेशनवर एका विकृतानं मागून तिला मिठी मारली आणि जबरदस्तीनं तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली मात्र लगेचच तिनं स्वतःला सावरत या विकृताचा प्रतिकार केला. यानंतर काही झालं नाही असा आव आणत विकृतानं तिथून पळ काढला. 

हा सर्व धक्कादायक प्रकार स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कंट्रोल रुममध्ये बसलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल निलेश दळवी आणि राहुल कुमार यांनी हा प्रकार कॅमेऱ्यात पाहिला. यानंतर त्यांनी तातडीने प्लॅटफॉर्मवर धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :MolestationविनयभंगCrimeगुन्हा