शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील पालिका शाळेची इमारत अपूर्णच

By admin | Updated: July 27, 2015 23:38 IST

घणसोली येथे चार वर्षांपूर्वी महापालिकेने शाळा बांधण्यात सुरुवात केली होती. मात्र मुदत संपली तरी शाळेच्या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे

नवी मुंबई : घणसोली येथे चार वर्षांपूर्वी महापालिकेने शाळा बांधण्यात सुरुवात केली होती. मात्र मुदत संपली तरी शाळेच्या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. बांधकामात अनेक विघ्ने आल्याने इमारत पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.घणसोली सिम्प्लेक्स व घरोंदा परिसरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सेक्टर ७ येथे महापालिकेची शाळा उभारली जात आहे. चार वर्षांपूर्वी सुमारे ८ कोटी रुपये खर्चाचे हे काम ओमकार कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले. त्यानुसार मोठ्या उत्साहात या शाळा इमारत उभारणीच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. परिसरात महापालिकेची शाळा होत असल्याने स्थानिकांनी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटल्याची भावना व्यक्त केली होती. मात्र चार वर्षे उलटूनही चार मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण होवू शकलेले नाही. त्यामुळे स्थानिकांकडूनही प्रशासनाच्या धीम्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात महापालिकेची शाळा नसल्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींना मुलांच्या शिक्षणासाठी खाजगी शाळेची पायरी चढावी लागत आहे. त्यामध्ये खिशाला आर्थिक झळही त्यांना सोसावी लागत आहे. महापालिकेच्या शाळा इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे अशी भावनाही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. चार वर्षांत या शाळा इमारतीचे काम अवघ्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचले आहे. त्यामुळे पूर्ण इमारत उभी होण्यास अद्यापही वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. एप्रिल २०१५मध्ये या ठेकेदाराची मुदतही संपली आहे. इमारतीचे डिझाईन तपासणीसाठी आयआयटीकडे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बराच कालावधी गेल्याने वेळेवर कामाला सुरवात झाली नाही. त्यानंतर खोदकामादरम्यान जमिनीखाली मोठा दगड आढळला होता. हा दगड फोडून पायाभरणी करण्यातही विलंब झाल्याचे ठेकेदाराने प्रशासनाला कळवले आहे. हे अडथळे पार करून कामाला सुरवात होत असतानाच रेती, सिमेंट अशा बांधकाम साहित्यांच्या पुरवठ्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे शाळा इमारतीच्या बांधकामाची गती अधिकच मंदावल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मदन वाघचौरे यांनी सांगितले. तर डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)