जानेवारीतील महासभा तहकूब

By Admin | Updated: January 28, 2017 03:08 IST2017-01-28T03:08:43+5:302017-01-28T03:08:43+5:30

जानेवारी महिन्याची महासभा जाहीर झाल्यानंतर ४ जानेवारीपासून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती.

General Assembly of January | जानेवारीतील महासभा तहकूब

जानेवारीतील महासभा तहकूब

नवी मुंबई : जानेवारी महिन्याची महासभा जाहीर झाल्यानंतर ४ जानेवारीपासून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. महासभेपूर्वी सचिवांमार्फत विषय पत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली होती आणि सभेला हिरवा कंदील मिळूनही आदर्श आचारसंहितेचे आकलन न झाल्याने शुक्रवारची महासभा तहकूब करण्यात आल्याचे प्रतिपादन महापौर सुधाकर सोनावणे यांनी केले. यावेळी सभागृृह नेते जयवंत सुतार यांनी शोकप्रस्ताव मांडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रध्दांजली वाहिली.
आचारसंहिता म्हणजे नक्की काय, आचारसंहितेचे उल्लंघन म्हणजे काय याची माहिती करून घेण्याचे आदेश महापालिका सचिव आणि प्रशासनाला यावेळी देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: General Assembly of January