शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

पावसामुळे फळांचे दर घसरले; भाजीपालाही राहिला शिल्लक, एपीएमसीत ग्राहकांनी फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:06 IST

बाजार समितीमध्ये सोमवारी फक्त ९०७ टन फळांची आवक झाली.

नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबईमध्येही सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारावरही झाला आहे. ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे फळांच्या दरामध्ये घसरण झाली आहे आणि मागणीअभावी भाजीपालाही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला.

बाजार समितीमध्ये सोमवारी फक्त ९०७ टन फळांची आवक झाली. ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरण्यास सुरुवात झाली आहे. हापूस आंब्याचे दर ५०० ते ६०० रुपये डझनवरून ३००  रुपयांवर आले. कर्नाटक हापूस व इतर आंब्याचे दरही प्रतिकिलो ९० ते २०० रुपयांवरून ८० ते १८० रुपयांवर आले आहेत. जांभळाचे प्रतिकिलो दर देखील ३५० ते ४५० रुपयांवरून २५० ते ३५० रुपये किलो झाले आहेत. गत आठवड्यात २०० ते ३०० रुपये  किलो दराने विकली जाणारी लिची १५० ते २०० रुपये किलोपर्यंत घसरली आहे.

सर्व मार्केट जलमय

बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. सोमवारी फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर २ फूट पाणी साचले होते. कांदा, बटाटा, मसाला व धान्य मार्केटमध्येही काही ठिकाणी पाणी साचले होते.  

कोथिंबीरसह, टोमॅटोचे नुकसान

भाजीपाला मार्केटमध्ये २ हजार टन आवक झाली आहे; परंतु ग्राहक नसल्यामुळे जवळपास ५०० टन माल शिल्लक राहिला आहे. कोथिंबिरीसह टोमॅटोचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाल्याच्या दरामध्ये फारसा फरक पडला नसून, गत आठवड्यात दर स्थिर आहेत.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीRainपाऊस