शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा हजार घरांना स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, सिडकोचा सर्वात मोठा गृहप्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 03:42 IST

सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत. १५ आॅगस्टपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक घटकांसाठी पुढील वर्षभरात नवी मुंबई क्षेत्रात ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी १४,८२० घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ही घरे कळंबोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमध्ये उभारली जात आहेत. यात एकूण ११ गृहप्रकल्पाचा समावेश असणार आहे. सिडकोने याअगोदर विविध गृहप्रकल्प उभारले आहेत; परंतु एकाच वेळी १४,८२० घरांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पातील अत्यल्प गटातील घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी असणार आहेत. स्वातंत्र्यदिनापासून या घरांच्या प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात करण्याची सिडकोची योजना आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली.सिडकोने आतापर्यंत विविध घटकांसाठी सव्वा लाख घरांची निर्मिती केली आहे; परंतु मध्यंतरीच्या काळात सिडकोला गृहनिर्मितीचा विसर पडला होता. त्यामुळे बजेटमधील घरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, आजही सिडकोच्या घरांना सर्वसामान्य घटकांची पसंती आहे, त्यामुळेच आगामी काळात विविध घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. १५ हजार घरांचा पहिला टप्पा पूर्ण करतानाच पुढील वर्षभरात ४० हजार घरांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या घरांच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.अर्जपुस्तिका विक्रीला फाटाआतापर्यंतच्या विविध गृहप्रकल्पात घरांच्या नोंदणीसाठी सिडकोने अर्जविक्रीची प्रक्रिया राबविली होती. अर्जपुस्तिका विक्री करताना येणाऱ्या अडचणी, त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहकांची होणार दमछाक तसेच या प्रक्रियेसाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ आदीचा विचार करून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अर्जपुस्तिका विक्रीला फाटा देत, म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार १४,८२० घरांसाठी आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत.दोन वर्षांत ग्राहकांना ताबाशहराच्या पाच नोडमध्ये ११ कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून १४,८२० घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यामुळे पात्र ठरलेल्या ग्राहकांना सहा हप्त्यात घरांचे पैसे भरता येणार आहेत.

टॅग्स :cidcoसिडकोHomeघर