कडधान्य व्यापाऱ्यांची दलालाकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:45 IST2019-05-14T00:45:29+5:302019-05-14T00:45:47+5:30
बनावट ग्राहकाच्या नावे कडधान्यांची खरेदी करून दलालाने व्यापाऱ्यांना साठ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कडधान्य व्यापाऱ्यांची दलालाकडून फसवणूक
नवी मुंबई : बनावट ग्राहकाच्या नावे कडधान्यांची खरेदी करून दलालाने व्यापाऱ्यांना साठ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
के. भरत उर्फ भरत सनसिंग चांदरा असे गुन्हा दाखल झालेल्या दलालाचे नाव आहे. तो एपीएमसी आवारात दलालीचे काम करायचा. त्याने काही वर्षात व्यापाºयांचा विश्वास संपादित करून हा अपहार केला आहे. मागील अनेक वर्षांपासून तो एपीएमसी धान्य मार्केटमध्ये दलालीचे काम करतो. यादरम्यान त्याने व्यापाºयांना ग्राहक मिळवून देऊन त्यांच्यातील व्यवहार देखील चोख ठेवले होते. मात्र मागील दोन महिन्यात त्याने अनेक व्यापाºयांकडून ग्राहकांच्या नावे मोठ्या प्रमाणात उधारीवर कडधान्य खरेदी केले. त्याच्या बिलाची रक्कम देण्यास तो टाळाटाळ करू लागला होता. यामुळे व्यापाºयांनी ट्रान्सपोर्टरच्या माध्यमातून ग्राहकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ज्यांच्या नावे माल घेतला ती बनावट नावे असल्याचे उघड झाले. त्यावरून के. भरत उर्फ भरत चांदरा याने आपली फसवणूक केल्याचे व्यापाºयांच्या निदर्शनास आले. सद्यस्थितीला विशाल शेठीया यांच्यासह इतर ५१ व्यापाºयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून एकूण सुमारे ६० लाखांचे कडधान्य त्याने उधारीवर खरेदी केले आहे. त्यामध्ये तूरडाळ, मूगडाळ, मसूर, चणाडाळ, वाटाणा आदींचा समावेश आहे. एपीएमसी आवारातून माल बाहेर नेताना संबंधित वाहनाचा गेटपास बनवणे आवश्यक आहे. मात्र के. भरत हा विना गेटपास मालाची वाहतूक करायचा हे देखील या प्रकरणात समोर आले आहे. तर बनावट ग्राहकांच्या नावे खरेदी केलेला माल त्याने मालाड येथील एका व्यापाºयाला स्वस्त दरात विकून स्वत:चा फायदा करून घेतला आहे.
व्यापाºयांच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याने इतरही अनेक व्यापाºयांची फसवणूक केल्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.