कळंबोली बॉम्ब प्रकरणात जिलेटीन पुरविणाऱ्या चौथ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 04:59 IST2019-07-14T04:58:53+5:302019-07-14T04:59:07+5:30
कळंबोली येथील सुधागड शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब ठेवणा-या तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

कळंबोली बॉम्ब प्रकरणात जिलेटीन पुरविणाऱ्या चौथ्या आरोपीला अटक
पनवेल : कळंबोली येथील सुधागड शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब ठेवणा-या तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात या आरोपींना जिलेटीन पुरवणाºया चौथ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश बन्सी राठोड (३५) असे या आरोपीचे नाव आहे.
कळंबोली येथील बॉम्ब प्रकरणातील सुशील साठे, मनीष भगत, दीपक दांडेकर या त्रिकुटाला बॉम्ब बनविण्यासाठी स्फोटके पुरविणाºयाचा पोलिसांनी शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना सुरेशची माहिती मिळाली. सुरेश दगडखाणीत काम करत असल्याने तेथे वापरल्या जाणाºया स्फोटकांची त्याला माहिती होती. त्यानुसार दीपक दांडेकर व मनीष यांनी मासे मारण्यासाठी जिलेटीन पाहिजे, असे सांगून सुरेश याच्याकडून जिलेटीन घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार सुरेश राठोड याला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली.