शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 06:23 IST

इतर ५० बस सुदैवाने सुरक्षित, इलेक्ट्रिक बसमुळे ही दुर्घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: NMMT च्या घणसोली येथील आगारातआग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यामध्ये चार बस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. इतर तीन ते चार बसचे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रिक बसमुळे ही दुर्घटना घडली आहे.

घणसोली आगारात एनएमएमटीच्या वापरात नसलेल्या सुमारे ५० बस उभ्या केल्या आहेत. त्याच ठिकाणी इलेक्ट्रिक बसदेखील उभी करण्यात आली होती. सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात असलेल्या इलेक्ट्रिक बस बंद पडण्याचे प्रकार सतत घडत आहेत. या इलेक्ट्रिक बसच्या बॅटरींमध्ये बिघाड होत असल्याचे समजते. अशातच घणसोली आगारात दुरुस्तीसाठी आलेल्या इलेक्ट्रिक बसला बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास आग लागली. 

काही वेळातच पूर्ण बसने पेट घेतल्याने बाजूलाच असलेल्या तीन डिझेल बस जळाल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघाले होते. आगीची माहिती मिळताच कोपरखैरणे व ऐरोली अग्निशमन दलाने तेथे धाव घेतली. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने  ५० बस वाचल्या.

‘पत्रकारांना आत सोडू नका’ 

आगारात लागलेल्या आगीची माहिती कळताच पत्रकार, छायचित्रकारांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र कोणत्याही पत्रकाराला आत सोडायचे नाही, असे अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगत माध्यमांना आत प्रवेश नाकारला. त्यावरून डेपोत नेमके काय गौडबंगाल चालले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

प्रशासन म्हणते, म्हणून आग गतीने पसरली

डेपोत आग लागलेल्या बसची नियमित दुरुस्ती करण्याची व सुट्या भागांसह जबाबदारी मूळ उत्पादक व पुरवठादार मे एम. एच इको लाइफ तथा जेबीएम यांची होती. इंजिन बिघाडामुळे एखाद्या बसच्या बॅटरी पॅकमध्ये (०४ बॅटरी पॅक) शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्याचे एनएमएमटी प्रशासनाने कळवले. 

कर्मचाऱ्यांनी त्वरित याबाबत उपलब्ध फायर एक्स्टिंग्वीशरने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले; परंतु ४ बॅटरी पॅक असल्याने व ते सील असल्याने आग गतीने पसरली. यामुळे अपघातग्रस्त बससह बंद ३ डिझेल बस (मे. महालक्ष्मी बस ट्रान्सपोर्ट प्रा.लि. यांच्या कंत्राटमधील) यांनाही आग लागल्याने त्यांचेही नुकसान झाले, असे एनएमएमटी प्रशासनाने म्हटले.

आगारात रिक्षा पार्किंग?

आगारात बस व अधिकाऱ्यांची वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश नसतानाही सर्व्हिस सेंटरला लागूनच रिक्षा उभ्या असल्याचे दिसून आले. त्यावरून आगारात रिक्षा पार्किंग होते? की इतर कोणत्या कामासाठी रिक्षांचा वापर होतोय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 

टॅग्स :fireआगNavi Mumbaiनवी मुंबई