शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बेलापूर येथील किल्ल्याची दुरवस्था; सिडकोची उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 23:02 IST

टेहळणी बुरु जाची पडझड, इतिहासप्रेमींकडून नाराजी

- योगेश पिंगळेनवी मुंबई : बेलापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याची आणि बुरुजाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, अनेक ऐतिहासिक घडामोडी पाहिलेला किल्ला परिसरात झालेल्या विकासकामांमुळे धोकादायक स्थितीमध्ये उभा आहे. सिडकोच्या उदासीनतेमुळे किल्ल्याबरोबर टेहळणी बुरुजाचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, किल्ल्याचे उरलेले मोजके अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.पनवेल आणि ठाण्याच्या खाडीचा संगम होणाऱ्या ठिकाणी बेलापूर गाव वसलेले आहे. आगरी, कोळी समाजाची वस्ती असलेल्या या गावात पोर्तुगिजांनी बेलापूर किल्ला बांधला होता. वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलीकडील मराठ्यांकडून होणाºया संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी सदर किल्ला बांधला होता. खाडीकिनारी असलेल्या भागात भराव टाकण्यात आल्याने तसेच किल्ल्याची देखभाल आणि दुरु स्तीकडे दुर्लक्ष केल्याने पडझड झाली आहे, त्यामुळे किल्ल्याचे काहीच अवशेष शिल्लक राहिले असून, किल्ल्याच्या एकमेव शिल्लक असलेल्या बुरु जाचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. शहर वसविणाºया सिडकोला या किल्ल्याची डागडुजी करण्याकडे विसर पडला आहे. २०१५ साली सिडकोमार्फत भरविण्यात आले होते, या वेळी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण केले जाणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी ११ कोटी रु पयांची भरघोस तरतूद केली होती, यामध्ये २०१७ सालापर्यंत सुशोभीकरण पूर्ण करण्यात येणार होते; परंतु सिडकोच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने अद्याप सुशोभीकरणासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. किल्ल्यावरील सर्व बांधकामे नष्ट झाली आहेत. फक्त एक टेहळणी बुरूज अर्धवट मोडकळलेल्या अवस्थेमध्ये आहे. बुरुजाला एका बाजूला भेग पडली आहे आणि दुसºया बाजूचे बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये असल्याने या ठिकाणी जाणाºया नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी किल्ल्याबरोबर या बुरुजाचेही रक्षण करण्याची आवश्यकता आहे. सिडकोने काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने पुन्हा फेरनिविदा काढली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.बेलापूर किल्ल्याला पाच बुरूज व तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३५ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.

टॅग्स :FortगडNavi Mumbaiनवी मुंबई