माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 00:24 IST2021-02-20T00:24:11+5:302021-02-20T00:24:35+5:30
Navi Mumbai : गुरुवारी रात्री बेडरूममध्ये गेले असता शुक्रवार दुपारपर्यंत बाहेर आले नाहीत. यामुळे घरातील व्यक्तींनी दरवाजा उघडला असता आतमध्ये ते लुंगीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.

माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांची आत्महत्या
नवी मुंबई : महापालिकेचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही.
गुरुवारी रात्री बेडरूममध्ये गेले असता शुक्रवार दुपारपर्यंत बाहेर आले नाहीत. यामुळे घरातील व्यक्तींनी दरवाजा उघडला असता आतमध्ये ते लुंगीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.
भोलानाथ ठाकूर (५२) हे नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक १ मधून २००० साली निवडून आले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत ते पुन्हा रिंगणात उतरले असता पराभूत झाले होते. शुक्रवारी दुपारी त्यांनी दिघा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे येत्या निवडणुकीत ते पुन्हा रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती.
त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते अधिक तपास करीत आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.