माजी नगरसेवक अशोक दरेकर बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:54 IST2018-06-07T01:54:41+5:302018-06-07T01:54:41+5:30
सीवूड येथून माजी नगरसेवक अशोक दरेकर बेपत्ता झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य खालावले आहे. यामुळे त्यांची स्मृती जात असतानाच मंगळवारी रात्री राहत्या परिसरात उद्यानात गेले असता परत आले नाहीत.

माजी नगरसेवक अशोक दरेकर बेपत्ता
नवी मुंबई : सीवूड येथून माजी नगरसेवक अशोक दरेकर बेपत्ता झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य खालावले आहे. यामुळे त्यांची स्मृती जात असतानाच मंगळवारी रात्री राहत्या परिसरात उद्यानात गेले असता परत आले नाहीत.
सीवूड येथे राहणारे नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक अशोक दरेकर (६८) मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत. साधारण दहा वर्र्षांपूर्वी दोनदा हृदयविकाराचा झटका आलेला. १५ वर्षांपूर्वीच्या नवी मुंबईतील राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर मात्र ते प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून अलिप्त राहिले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊन स्मृती कमकुवत झालेली आहे. यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी कुटुंबीयांनी एका व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. ही व्यक्ती मंगळवारी रात्री काही कामानिमित्ताने इतर ठिकाणी गेलेली होती. या वेळी दरेकर हे नेहमीप्रमाणे राहत्या इमारतीखालील उद्यानात बसण्यासाठी एकटेच गेले होते. मात्र, यानंतर ते परत घरी न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध घेतला; परंतु शोध घेऊनही ते न सापडल्याने त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.