ठाणे जिल्ह्यांतील २८ ग्रामपंचायतींत प्रथमच दीड काेटी खर्चाचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प
By सुरेश लोखंडे | Updated: April 7, 2023 17:01 IST2023-04-07T17:01:15+5:302023-04-07T17:01:31+5:30
भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे.

ठाणे जिल्ह्यांतील २८ ग्रामपंचायतींत प्रथमच दीड काेटी खर्चाचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प
ठाणे : मुंबई, ठाणे महानगरांना लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील गांवखेड्यात कचरा समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी शहरांजवळच्या तब्बल २८ ग्राम पंचायतींमध्ये प्लॅस्टीकची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतले आहे. त्यासाठी तब्बल दीड काेटी रूपये प्रत्येक ग्राम पंचायतीला दिले आहे.
दिवसेंदिवस प्लॅस्टिक वापर वाढत आहे. त्यातून गंभीर समस्य उभी राहत आहे. त्यास वेळीय पायबंद घालण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदे प्रथमच प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील रस्त्याच्या कडेला व महामार्गावर प्लॅस्टिक सारख्या घातक कचऱ्याचे व्यवस्थापन प्रक्रीया प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्लॅस्टिकचा पुणर्वापर हा उपक्रम औद्योगिक क्षेत्रात महत्त्वचे योगदान ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रात इंधनाच्या स्वरूपात प्लॅस्टिक वापरले जाणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत प्लास्टिक पासून रस्ता तयार करण्यात येणार आहे.
भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. गाव पातळीवर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काल्हेर येथे प्लॅस्टिक व्यवस्थापन केंद्रांची उभारणी हाेत आहे. १५ वित्त आयोगाच्या माध्यमातून २८ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात प्रत्येकी दीड कोटीचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून दिली जात आहे.
असा उभा राहताेय प्रकल्प-
या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेसाठी पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतींना ८० लाखांच्या निधीतून जागेची हमी घेणे, ५० काचरा वेचक महिलांचे पथक नेमणे व त्यांच्या मार्फत कचरा गोळा करून विघटन करणे, साप करुन, वाळवून, मशीन द्वारे बारीक तुकडे करून प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा परिषद तर्फे पहिल्यांदा प्लॅस्टिक व्यवस्थापनेसाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.