रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा
By Admin | Updated: May 30, 2017 06:28 IST2017-05-30T06:28:47+5:302017-05-30T06:28:47+5:30
उरण रेल्वे मार्गासह सीवूड रेल्वे स्टेशनचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी दोन्हीही प्रकल्प

रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उरण रेल्वे मार्गासह सीवूड रेल्वे स्टेशनचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी दोन्हीही प्रकल्प महत्त्वाचे असून यासाठी रेल्वे मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केले आहे.
सीवूड रेल्वे स्टेशनमधील नवीन एटीव्हीएम मशिनचे उद्घाटन राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सिडको अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेवून नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामांची पाहणी केली. नेरूळ-उरण रेल्वे मार्गाचे काम कधीपर्यंत सुरू होणार. रेल्वे प्रकल्प रखडल्याने उरण परिसरातील विकासही धीम्या गतीने सुरू आहे. त्या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून मुंबई व नवी मुंबईमध्ये ये - जा करण्यास गैरसोय होत आहे. नोव्हेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिले. कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात रेल्वेसेवा कधी सुरू करायची हा विषय रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विचारे यांनी कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. कामामध्ये अडथळे असल्यास सांगावेत, ते सोडविण्यात येतील असे सांगितले.
सीवूड रेल्वे स्टेशनच्या दारावे बाजूला तिकीट खिडकी सुरू करण्याबरोबर येथील प्रवाशांना भेडसावणारे इतर प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आदेशही यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. एटीव्हीएम मशिनच्या उद्घाटनाच्यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, आमदार रवींद्र फाटक, नामदेव भगत, द्वारकानाथ भोईर, प्रकाश पाटील, गणपत शेलार, उषा रेणके, एम. के. मढवी, सोमनाथ वास्कर, ज्ञानेश्वर सुतार, समीर बागवान, महेश कोठीवाले, सुमित्र कडू, गणेश घाग, संतोष मोरे, सुरेश सपकाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.