शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खारफुटीमुळे सीबीडीला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:18 IST

या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

योगेश पिंगळेनवी मुंबई : गेली अनेक वर्षे सफाई न झाल्याने सीबीडीतील होल्डिंग पाँडमध्ये खारफुटीची बेसुमार वाढ झाली आहे. त्यात होल्डिंग पाँड भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने गेल्या काही वर्षांपासून सीबीडीतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत आहेत. या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना, मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे शहरात पाणी शिरू नये, यासाठी काय करता येईल, याचा सिडकोने सविस्तर अभ्यास केला होता. यानंतर, नवी मुंबई शहरात सुमारे ११ ठिकाणांच्या खाडी किनाऱ्याजवळ होल्डिंग पाँड तयार तयार करण्यात आले होते. या पाँडच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी पाँडमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने दरवाजांची रचना करण्यात आली होती. आहोटी सुरू होताच, पाँडमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून, त्यातील पाणी आपोआप खाडीत जाईल, अशी या पाँडची रचना करण्यात आली होती. त्यामुळेच २६ जुलैच्या मुसळधार पावसातही होल्डिंग पाँडमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच झाला होता.या पाँडमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ मोठ्या प्रमाणावर साचला असून, त्याची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी खारफुटीची जंगले उभी राहिली आहेत.सीबीडी विभागातील पाण्याचा निचरा होणाºया ठिकाणी सेक्टर १३ येथे मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. या होल्डिंग पाँडमध्ये सीबीडी विभागातील सेक्टर १, १ ए, २, ३, ४, ५, ६, ९, ९ एन आदी सेक्टरमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी, तसेच सीबीडीतील डोंगरावरील काही प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जाते. सीबीडी येथील सायन-पनवेल महामार्गाजवळून होल्डिंगपाँडकडे वाहून जाणाºया पाण्याच्या मार्गाचीही स्वच्छता करण्यातआलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.>होल्डिंग पाँडची निर्मिती शहरच्या रक्षणाकरिता करण्यात आली होती, परंतु त्यांची स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, खारफुटी वाढलेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून होल्डिंग पाँडची स्वच्छता करण्यासाठी महासभा, स्थायी समिती सभेत आवाज उठविला होता, परंतु अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- डॉ. जयाजी नाथमाजी नगरसेवक