शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

श्रावणात प्रथमच कोरोनामुळे खांदेश्वरचे देऊळ बंद; सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:41 PM

भाविकांनी घरी राहून घेतले महादेवाचे दर्शन; ६२ वर्षांची परंपरा खंडित

कळंबोली : श्रावण महिन्यात पनवेल महापालिका क्षेत्रात महादेव मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे, श्रावणी सोमवारी शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा मंदिरासमोर लागतात, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्याकरिता खांदा वसाहतीतील खांदेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंदच राहणार आहे. त्यामुळे यंदा भाविकांना घरच्या घरीच श्रावण मास साजरा करावा लागणार आहे.

भारतीय संस्कृतीत श्रावण महिना आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यात धार्मिक विधी व व्रतवैकल्ये केल्यास अधिक लाभ होतो, अशी धारणा आहे. दरवर्षी या निमित्ताने खांदा वसाहतीतील खांदेश्वर महादेव मंदिर , कळंबोली सेक्टर ३ येथील सिटी रुग्णालयाजवळील महादेव मंदिर, कामोठे सेक्टर १५ येथील शंकर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात, तसेच या परिसरात यात्राही भरवली जाते.

खांदा वसाहतीत खांदेश्वर मंदिरात या श्रावण महिन्यात शहरासह ग्रामीण भागातील भाविक गर्दी करतात. दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहून मंदिरात प्रवेश मिळवला जातो, परंतु यंदा कोरोनामुळे चार महिन्यांपासूनच सर्व देवळे बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने, श्रावण मास काळातही हे मंदिरे बंद राहणार आहेत. त्यामुळे गेल्या ६२ वर्षांपासून पारंपरिक चालत आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात खंड पडणार आहे. खांदेश्वर महादेव मंदिर चार महिन्यांपासून कुलूप बंद आहे. सकाळी आणि संध्याकाळी पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा केली जाते. सोमवारी सर्व मंदिरांची साफसफाई करण्यात आली, तर संपूर्ण परिसर पाण्याने धुण्यात आला.

यात्रा भरली नसल्याने अनेकांचा रोजगार बुडाला

श्रावणमासात दर सोमवारी मोठ्या प्रमाणात महादेव मंदिरात भाविकांकडून गर्दी केली जाते. या परिसरात नारळविक्री करणारे, तसेच बेलपत्र, फुलांचे हार, अभिषेकासाठी लागणारे भटजी बुवा यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा कोरोनाचे सावट पसरल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्याचबरोबर, मंदिराच्या परिसरात यात्राही भरवली जाते. या यात्रेत लहान मुलांची खेळणी, फुगेवाले, विविध साहित्याची विक्री केली जाते. या यात्रेतून हजारो रुपयांची उलाढाल होत असते. तिलाही आता कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.

खांदा वसाहतीतील खांदेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागातून भाविक येतात. यंदा कोरोनामुळे चार महिन्यांपासून मंदिर बंद आहे आणि श्रावणमासातही गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंदच राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे खांदेश्वर महादेव मंदिर स्ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.- बामीबाई गोवारी, अध्यक्ष खांदेश्वर महादेव मंदिर देव स्थान, खांदा वसाहत

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई