शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Fire turbhe company : नवी मुंबईच्या तुर्भेत कलर कंपनीत भीषण अग्नीतांडव; ३ कंपन्यांमध्ये पसरली लाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 13:01 IST

Fire turbhe MIDC company :  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी मधील बालाजी पॉलीकोट्स या कंपनीला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. काही वेळातच हि आग लगतच्या इतर दोन कंपन्यांपर्यंत पसरली. यावेळी अग्निशमन दलाने लगतच्या कंपन्यांना लागलेली आग वेळीच आटोक्यात आणली. परंतु रंग कंपनीला लागलेली आग सुमारे सहा तास धुमसत होती. त्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे.

सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बालाजी पॉलीकोट्स (डी ३१५) या कंपनीत हि आग लागली. आगीमध्ये कंपनीतील रंगासाठी वापरलेल्या जाणाऱ्या केमिकल चे ड्रम पेट घेऊन फुटत होते. यामुळे काही वेळातच हि आग बालाजी कंपनीच्या मागच्या व डाव्या बाजूच्या कंपनीत देखील पसरली. त्यामुळे परिसरातील इतरही कंपन्यांना आगीचा  होता. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चारही बाजूने कंपनी पेटत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते.

अखेर अग्निशमन दलाने लगतच्या दोन कंपन्यांमध्ये पसरलेली आग आटोक्यात आणून तिन्ही बाजूने बचावकार्य सुरु केले. यादरम्यान एक कामगार कंपनीत अडकल्याची माहिती मिळत होती. परंतु आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाल्याने त्या व्यक्तीच्या जिवंत वाचण्याची शक्यता कमी होती. अखेर सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर कंपनीत अडकलेल्या बहादूर नावाच्या कामगाराचा मृत्यदेह शोधण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. परंतु दुपार पर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता. 

आगीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तीन कंपन्यांपर्यंत पसरलेली आग वेळीच आटोक्यात आली नसती तर काही अंतरावरील झोपडपट्टी भागालाही धोका निर्माण झाला असता. या भीतीने परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलNavi Mumbaiनवी मुंबई