पनवेलमधील तक्का गावातील झोपडपट्टीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 06:55 IST2018-03-22T00:28:25+5:302018-03-22T06:55:52+5:30

पनवेलमधील तक्का गावातील झोपडपट्टीला आग लागल्याचे वृत्त आहे. 

A fire in a slum in Takka village of Panvel | पनवेलमधील तक्का गावातील झोपडपट्टीला आग

पनवेलमधील तक्का गावातील झोपडपट्टीला आग

नवी मुंबई : पनवेलमधील तक्का गावाजवळील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग बुधवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास लागली. एका झोपडीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यानंतर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या आगीत 25 ते 30 झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचे समजते. 



 



 

Web Title: A fire in a slum in Takka village of Panvel