शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा एमआयडीसीत अग्निसुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:37 IST

गेल्या दोन-तीन वर्षांत तळोजात औद्योगिक वसाहतीतील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेकायदा गोदाम, गॅरेज, भंगार गोदामांमुळे औद्योगिक वसाहतीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

तळोजा : गेल्या दोन-तीन वर्षांत तळोजात औद्योगिक वसाहतीतील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेकायदा गोदाम, गॅरेज, भंगार गोदामांमुळे औद्योगिक वसाहतीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. प्रशासनाची अग्निशमन यंत्रणा तोकडी पडत असल्याचे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनांमधून समोर येत आहे.२०१७ मध्ये एकूण ६४ कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या, यातील काही गंभीर होत्या. तर २०१८ मध्ये या ८५ आगीच्या घटना घडल्याची नोंद आहे. यापैकी मेम्बाकेम, कैराव केमिकल्स, हौसीया कोल्डस्टोरेज, फोमहोम या कारखान्यांत गंभीर स्वरूपाच्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तळोजात औद्योगिक वसाहत सुमारे ९०० हेक्टर जागेत वसलेली असून, यात १२०० प्लॉटवर लहान-मोठे ९१५ कारखाने आहेत. यात बहुतांश रासायनिक कारखाने असून या कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना नसल्याचे दिसून येत आहे.तळोजा औद्योगिक परिसरातील अग्निशमन दलाकडे दोन अग्निशमन बंब असून, दोन अधिकारी व १८ कर्मचारी कार्यरत आहेत. ९१५ कारखान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अग्निशमनच्या अवघ्या १८ कर्मचाºयांवर आहे, त्यामुळे कंपन्यांमधील अग्निरोधक यंत्रणा तपासणे, आग लागू नयेम्हणून उपाययोजना, जनजागृती होण्यात मनुष्यबळाअभावी मर्यादा येत आहेत.तळोजा औद्योगिक वसाहतीत कोल्ड स्टोरेज कारखान्यांची संख्याही मोठी आहे, यामध्ये वापरला जाणारा घातक अमोनिया वायुगळतीच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच येथील नाईक ओशिअनिक कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे पाच कामगार जखमी झाले होते.अन्य यंत्रणांचा आधारएमआयडीसीतील ९१५ कंपन्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत अग्निशमन यंत्रणा अपुरी पडते. परिणामी, एखादी दुर्घटना घडली की, बाहेरील किंवा खासगी कंपन्यांच्या यंत्रणांची मदत घ्यावी लागते. आगीचे कॉल आल्यानंतर तळोजा औद्योगिक वसाहत सोडून अंबरनाथ, डायघर, दहिसर, डोंबिवली या ठिकाणी यंत्रणा मागवावी लागते.जीवितहानीतळोजा औद्योगिक वसाहतीत २०१७ मध्ये ६४ तर २०१८ मध्ये जवळपास ८५ आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. तर २०१६ मध्ये टिकिटार या कंपनीतील आगीच्या घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला होता.फायर आॅडिट अहवालाबाबत अनभिज्ञकारखाना सुरू झाल्यानंतर अग्निशमन विभागाकडून दाखला दिला जातो. आणि दरवर्षी कंपनीकडून फायर आॅडिट करणे होणे बंधनकारक असते. मात्र तसे होत नसल्याचे अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडे तळोजा अग्निशमनचा संपर्कक्रमांकही नाही. रासायनिक कंपन्या, कोल्ड स्टोरेज कंपन्यांनी अग्निसुरक्षेबाबत जागृती असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना नाहीत, शिवाय संपर्कक्रमांकही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगीची घटना घडली की कर्मचारी १०० किंवा १०१ क्रमांकावर संपर्क साधतात. त्यांच्याकडून स्थानिक यंत्रणांना कळवले जाते, त्यामुळे अनेकदा घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याचे अग्निशमन दलातील कर्मचाºयांकडून सांगण्यात येते.तळोजा परिसरातील आगीच्या घटना कमी झाल्या आहेत. अग्निसुरक्षेबाबत आम्ही कंपन्यांमध्ये जनजागृती करत आहोत. आगीच्या घटनांचे नेमके कारण काय? व घटना टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत कारखानदारांना नेहमीच मार्गदर्शन केले जाते.- दीपक दोरु गडे,अग्निसुरक्षा अधिकारी, तळोजा

टॅग्स :fireआग