नवीन पनवेल पोस्ट कार्यालयाला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:49 IST2019-03-06T23:49:21+5:302019-03-06T23:49:27+5:30

नवीन पनवेल पोस्ट कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जनरेटर जळून खाक झाले. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला.

Fire to New Panvel Post Office | नवीन पनवेल पोस्ट कार्यालयाला आग

नवीन पनवेल पोस्ट कार्यालयाला आग

पनवेल : नवीन पनवेल पोस्ट कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जनरेटर जळून खाक झाले. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. सध्याच्या घडीला पनवेल शहर व नवीन पनवेलमधील पोस्ट कार्यालय एकाच ठिकाणावर भरत आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे या ठिकाणी एकच खळबळ उडाली.
नवीन पनवेल अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. मात्र, या ठिकाणचे जनरेटर खाक झाले. अग्निशमन दलाला या ठिकाणी लागलेल्या आगीची माहिती व्यवस्थितरीत्या दिली गेली नसल्याने अग्निशमन दल जुन्या पोस्ट कार्यालयात पोहोचले. तेथील कार्यालय स्थलांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दल नवीन पनवेल या ठिकाणी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळविले.

Web Title: Fire to New Panvel Post Office