शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आगीस व्यवस्थापनच जबाबदार

By admin | Updated: December 25, 2015 02:38 IST

पनवेल बसस्थानकासमोरील दुकानाला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत बिकानेर स्वीट कॉर्नरच जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे

पनवेल : पनवेल बसस्थानकासमोरील दुकानाला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत बिकानेर स्वीट कॉर्नरच जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुन्या वीज वायर, वीज जोडणीत बिघाड असल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अहवाल पेण येथील विद्युत निरीक्षकांनी सादर केला आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बाजूच्या मिलेनियम जम्बो झेरॉक्स दुकानाचे मोठे नुकसान झाले. या जळीत नुकसानभरपाईची जबाबदारी बिकानेरच्या मालकाची असल्याचे अहवालात नमूद आहे.पनवेलमधील साई आॅर्केड इमारतीतील डी विंगमध्ये असलेल्या बिकानेर कॉर्नरवरील मिठाईच्या दुकानाला ५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली होती. बाहेर दिवाळीनिमित्त मंडप बांधला असल्याने मंडपाच्या कपड्याने त्वरित पेट घेतला. या आगीत बिकानेर कॉर्नरसह बाजूचे मिलेनियम झेरॉक्सचे दुकान खाक झाले होते. येथील मशिन जळाल्या. यामध्ये मिलेनियम झेरॉक्सचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर पोलिसांनी पेण येथील विद्युत निरीक्षण विभागाकडून अहवाल मागितला होता. त्यानुसार या कार्यालयाकडून जळीत अपघाताची चौकशी केली. घटनास्थळाचे प्रत्यक्ष निरीक्षणावरून विद्युत निरीक्षकांनी निष्कर्ष काढला आहे. (प्रतिनिधी)