इमारतीच्या मीटर रूममध्ये आग! वाशीतली घटना; अग्निशमन दलाने हाताळली परिस्थिती
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 26, 2023 19:05 IST2023-10-26T19:05:06+5:302023-10-26T19:05:28+5:30
वाशी येथील इमारतीच्या मीटर रूमला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

इमारतीच्या मीटर रूममध्ये आग! वाशीतली घटना; अग्निशमन दलाने हाताळली परिस्थिती
नवी मुंबई : वाशी येथील इमारतीच्या मीटर रूमला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. तमजल्यावर लागलेल्या आगीमुळे वरच्या मजल्यावरील नागरिक अडकले गेल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वाशी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग आटोक्यात आणली.
वाशी सेक्टर १७ येथील बॉंबे एनएक्स सोसाटीच्या ए विंग मध्ये हि घटना घडली. इमारतीच्या तमजल्यावर जिन्यालगत असलेल्या मीटर रूममध्ये आग लागली होती. यामुळे वरच्या मजल्यांवरील नागरिक घरांमध्ये अडकले होते. तर आग अधिक पसरल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. यामुळे आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व नागरिकांना छतावर नेऊन सुरक्षित केले. त्याचवेळी मीटर रूम मधील आगीवर देखील नियंत्रण मिळवले. यामुळे वेळीच आग आटोक्यात येऊन मोठी दुर्घटना टळली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.