फायर फायटिंगचे धडे

By Admin | Updated: April 21, 2016 02:53 IST2016-04-21T02:53:24+5:302016-04-21T02:53:24+5:30

कळंबोली वसाहतीत अनेक गगनचुंबी इमारती आहेत. अशा उंच इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी जिकिरीचे ठरते

Fire Fitting Lessons | फायर फायटिंगचे धडे

फायर फायटिंगचे धडे

कळंबोली : कळंबोली वसाहतीत अनेक गगनचुंबी इमारती आहेत. अशा उंच इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी जिकिरीचे ठरते. आगीसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी रहिवाशांनीही दक्ष राहाणे गरजेचे असते. याकरिता कळंबोली अग्निशमन केंद्राच्या वतीने उंच इमारतींतील रहिवाशांना नुकतेच आग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत माहिती व फायर फायटिंगचे धडे देण्यात आले. अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्र म हाती घेण्यात आला होता.
कळंबोलीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. रोडपाली येथे टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. या गगनचुंबी इमारतींमध्ये फिक्स फायर फायटिंग यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. ती बसविल्यानंतर त्याची सातत्याने तपासणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असे असतानाही याबाबत फारशे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे आगीसारख्या घटना घडून मोठे नुकसान होते. खारघरमध्ये उंच इमारतींत अनेकदा आगीच्या घटना घडल्या आहेत.
अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाचे निमित्त साधत कळंबोली अग्निशमन केंद्राच्या वतीने भूमी गार्डन, नील सिद्धी एमजीएम रुग्णालय, त्याचबरोबर इतर इमारतींमध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी आग कशामुळे लागते, ती कशी विझवायची, याबाबत येथील रहिवाशांना माहिती देण्यात आली. विशेषकरून याबाबत महिलांना अधिक जागृत करण्यात आले असल्याचे उप अग्मिशमक अधिकारी प्रतीक शिंदे यांनी सांगितले.
नवीन पनवेल अग्निशमन केंद्रात प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांना आग विझविण्याबाबतची विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहामध्ये जनजागृती केली असल्याचे कळंबोली केंद्राचे प्रमुख नानाभाऊ राठोड यांनी सांगितले.

Web Title: Fire Fitting Lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.