शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उरण येथील वैष्णौ लाँजिस्टीक कंटेनर गोदामाला आग: एक रसायन भरलेला कंटेनर कार्गो, पोकलेन जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:25 IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबाच्या साहाय्याने दोन तासात आग आटोक्यात आणली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

मधुकर ठाकूर

उरण : आठ दिवसांपूर्वी वेश्वी येथील सामवेद लॉजिस्टिकला लागलेल्या आगीचा धुरळा बसण्याच्या तयारीत असतानाच सोमवारी (१५) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उरणमधील चिर्ले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वैष्णौ लॉजिस्टिक कंटेनर मालाच्या गोदामाला आग लागली.रसायन भरलेल्या एका कार्गो कंटेनरला लागलेल्या आगीत एक कार्गो आणि पोकलेन आदी मशिनरी आगीत भस्मसात झाली.मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबाच्या साहाय्याने दोन तासात आग आटोक्यात आणली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.  येथील वैष्णो लॉजिस्टिक कंटेनर मालाच्या गोदामात एका हजरडस्ट ठेवण्यात आलेल्या कार्गो कंटेनरला अचानक आग लागली.आगीच्या भक्षस्थानी घातक रसायनांचा साठा असलेले ड्रम पेटल्याने क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.आगीचे लोण आसमंताला भिडले.काळ्या धुरामुळे आसमंत काळंवडला.या आगीत रसायन भरलेला एक कार्गो कंटेनर आणि पॉकलन जळून खाक झाला आहे.   आगीची घटना समजताच घटनास्थळी जेएनपीए, सिडको, नवीमुंबई अग्निशमन दलाच्या पाच बंब दाखल झाले.अग्नीशमक दलाच्या जवानांनी ११ बंब आणि फोमच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.दरम्यान आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.रसायनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.पंचनामे करून चौकशीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.दोन वर्षांपूर्वी याच लॉजिस्टिकला भीषण आग लागली होती.नव्या वर्षातील उरणमधील ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल