शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

तळोजात पुन्हा अग्नितांडव; ९७० कारखान्यांची जबाबदारी १८ कर्मचा-यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:42 IST

महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या तळोजा एमआयडीसीमध्ये आगीचे तांडव सुरू झाले आहे. कंपन्यांना भीषण आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या तळोजा एमआयडीसीमध्ये आगीचे तांडव सुरू झाले आहे. कंपन्यांना भीषण आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्योजकांची उदासीनता व अग्निशमन केंद्रातील अपुºया मनुष्यबळामुळे वेळेत आग आटोक्यात आणता येत नाही. ८६३ हेक्टर जमिनीवरील ९७० कारखान्यांची सुरक्षा फक्त १८ कर्मचाºयांवर अवलंबून असून अशीच स्थिती राहिली तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊन प्रचंड जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील टिकिकार कंपनीला २१ मार्च २०१६ रोजी भीषण आग लागली. या आगीमध्ये तब्बल चार जणांचा मृत्यू व ८ जण गंभीर जखमी झाले. जीवित व वित्तहानी झालेल्या या दुर्घटनेनंतर तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये अग्निशमनच्या नियमांचे पालन केले जात नाही. आग लागू नये व लागलीच तर ती तत्काळ विझविता यावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी अत्यावश्यक उपाययोजना करणे आवश्यक असते; परंतु बहुतांश कारखान्यांमध्ये काहीही उपाययोजना केलेल्या नसल्याचे निदर्शनास येऊ लागले. अग्निशमनविषयी बहुतांश उपाययोजना फक्त कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले. तळोजा अग्निशमन केंद्राच्या वतीने सर्व कारखान्यांचे सुरक्षा आॅडिट करून त्यांना दाखला देणे आवश्यक असते. ज्या कारखान्यांमध्ये नियमांचे पालन केले नाही त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असते; परंतु नियम धाब्यावर बसवूनही संबंधितांवर काहीही कारवाई केली जात नाही. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू असल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये लागलेल्या छोट्याशा आगीचे काही वेळेत अग्नितांडवामध्ये रूपांतर होत असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे.तळोजा औद्योगिक वसाहत ८६३ हेक्टर जमिनीवर वसली आहे. जवळपास ९७० कारखाने असून त्यामध्ये ७५ हजार नागरिकांना प्रत्यक्ष व ५० हजार नागरिकांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होत आहे. एमआयडीसीचे स्वतंत्र अग्निशमन केंद्र आहे; परंतु या केंद्रामध्ये पुरेसे मनुष्यबळच नाही. केंद्र चालविण्यासाठी ३६ कर्मचारी आहेत; परंतु प्रत्यक्षात १८ कर्मचारीच उपलब्ध आहेत. या कर्मचाºयांना तीन पाळ्यांमध्ये विभागल्यामुळे एक वेळी ६ कर्मचारीच कर्तव्यावर उपलब्ध असतात. मोठी आग लागली तर उर्वरित कर्मचाºयांची सुट्टी रद्द करावी लागते. आराम करण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयांनाही आग विझविण्यासाठी पाठवावे लागत आहे. अग्निशमनचे व निवासी संकुल सोडून कर्मचाºयांना इतर ठिकाणी जाताही येत नाही. खूप मोठी आग लागली की, तळोजा केंद्र हतबल होत असून सिडको, नवी मुंबई महानगरपालिका व वेळ पडल्यास मुंबई महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला बोलवावे लागत आहे. शासनाने वेळेत याविषयी उपाययोजना केल्या नाहीत तर मोठी दुर्घटना होऊन एकाच वेळी शेकडो कर्मचाºयांचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासन यंत्रणा अग्नितांडव थांबविणार की नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.३० नोव्हेंबर २०१६ : येथील निडिलॅक्स केमिकल कंपनीला भीषण आग लागली. दीपक फर्टिलायझर कंपनीला लागून असलेल्या निडिलॅक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दीपक फर्टिलायझरमधील बंबाच्या साहाय्याने येथील आग विझविण्यात आली. लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.२७ आॅगस्ट २०१७ : पराग केमिकलला २७ आॅगस्ट रोजी आग लागली. अमोनियाचा साठा असल्यामुळे आग भडकली व कंपनीमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. नवी मुंबई, तळोजा, कळंबोली, पनवेल अग्निशमन केंद्रातील वाहनांच्या साहाय्याने आग विझवली.तळोजा औद्योगिक वसाहतीत वारंवार आग लागण्याची घटना घडत आहे. या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. नियम धाब्यावर बसविणाºया कारखानदारांवर कारवाई करण्यात यावी.२९ जानेवारी २०१७ रोजी तळोजातील एका कोल्ड स्टोरेजला आग लागली. पाण्याच्या टाकीत पडून तीन कर्मचाºयांचा मृत्यू झाला होता. या घटनेविषयी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून कारखानदार कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली होती.

महत्त्वाच्या दुर्घटना...मार्च २०१६तळोजा एमआयडीसीतील टिकिटार कंपनीमध्ये २१ मार्चला भीषण आग लागली. या आगीमध्ये ८ कामगार गंभीर जखमी झाले होते. यापैकी अखिलेश गुप्ता, टुनटुन सिंग, संजीव सिंग व संजय वासू म्हात्रे या चार जणांचा मृत्यू झाला होता.फेब्रुवारी २०११तळोजामधील बुनेशा केमिकल कंपनीमध्ये ३ फेब्रुवारी २०११मध्ये भीषण आग लागली. ही आग पसरल्यामुळे शेजारी असलेल्या रचना अ‍ॅग्रोचेही नुकसान झाले होते. अग्निशमन दलाच्या दक्षतेमुळे परिसरातील मोदी फार्मा, तळोजा पेट्रोकेमिकल कंपनीचे आगीपासून रक्षण केले होते. आग विझविण्यासाठी दहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते.आॅक्टोबर २००६२८ आॅक्टोबरला येथील डॉर्फ केटल कंपनीला भीषण आग लागली. कंपनीमध्ये केमिकलचा मोठ्या प्रमाणात साठा होता. कंपनीत स्फोटही झाला होता. मुुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली.डिसेंबर २०१३तळोजामधील केमिकल कंपनीला ३ डिसेंबर २०१३ रोजी भीषण आग लागली. केमिकलचा स्फोट झाल्याने पूर्ण परिसर हादरून गेला होता. अग्निशमन जवानांनी कौशल्याने आग नियंत्रणात आणली होती.एप्रिल २०१३भूखंड क्रमांक तीन वरील चेम्सिक केमिकल कंपनीमध्ये आग लागली. रात्री ८.३० वाजता लागलेली आग पहाटे ६.३० वाजता विझली. आग विझविण्यासाठी दहा तास अथक परिश्रम करावे लागले होते.जानेवारी २०११येथील इंडियन आॅइल कंपनीमध्ये १८ जानेवारी २०११मध्ये आग लागली होती. ३० बंब व अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली होती.१९ डिसेंबर २०१६येथील मेंबा कंपनीला १९ डिसेंबरला अचानक आग लागली. आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आठ वाहनांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणली होती. तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आणली होती.

टॅग्स :fireआग