पणती-किल्ल्यांसाठी माती मिळेना
By Admin | Updated: October 16, 2014 22:52 IST2014-10-16T22:52:02+5:302014-10-16T22:52:02+5:30
पारंपारिक पद्धतीने येथील कुंभारवाडय़ात बनविण्यात येणारे मातीचे किल्ले, मावळे, पणत्या बनविण्यासाठी शेतातील माती मिळणो कठीण झाले आहे.

पणती-किल्ल्यांसाठी माती मिळेना
विनायक बेटावदकर - कल्याण
पारंपारिक पद्धतीने येथील कुंभारवाडय़ात बनविण्यात येणारे मातीचे किल्ले, मावळे, पणत्या बनविण्यासाठी शेतातील माती मिळणो कठीण झाले आहे. त्यामुळे पणत्या मावळे यासारखा दिवाळी सणाला होणारा व्यवसाय धोक्यात आला आहे, अशी खंत गेले दीडशे वर्षे वंश परंपरागत कुंभार वाडय़ात व्यवसाय करणा:यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षात कल्याण शहर परिसराचा मोठय़ा प्रमाणात विकास झाला. ग्रामीण भागात शेती नष्ट होऊन नगरे,कॉम्प्लेक्स उभी राहिल्याने शेती नष्ट झाली. या शेतातील माती बैलगाडय़ांच्या हिशेबात खरेदी करून त्यातून मुलांसाठी किल्ले, मावळे पणत्या बनविण्यात येत.
कुंभारवाडय़ात आजही 35 ते 4क् कुटुंबे मातीपासून माठ, गणपती बनवण्याचा व्यवसाय करतात. तसेच दिवाळीसारख्या मोसमात पणत्या, मावळे बनवतात त्याना कल्याण प्रमाणोच कर्जत, नाशिक जिल्ह्यातून मोठी मागणी आहे. मोसमात खर्च वजा जाता साधारण प्रत्येक कुटुंबाला 25 ते 3क् हजार रु . सुटतात.
अलीकडच्या काळात शेतातून येणारी माती मिळणो कठीण झाले. त्यामुळे शाडूच्या मातीचे मावळे,किल्ले बनवण्याची वेळ आली आहे.
कुंभार वाडय़ात मंगेश तुपगावकर, मनोज मुरबाडकर, गीता येलेकर, सुंदर केमबुळकर, कमळाकर तुपगावकर,मधुकर येलेकर हे मातीची खेळणी म्हणजे शिवाजी महाराज, मावळे, मातीच्या परडय़ा, बुलाबाई, बनवतात। सध्या शेतातील मातीचे खुपचं शॉर्टेज आहे. त्यामुळे मालाचा पुरवठा करण्यासाठी बाहेरून पणत्या आणाव्या लागतात.माटुंगा,भिवंडी येथे साच्यात बनवलेल्या आधुनिक पद्धतीचे नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी पणत्या कल्याणात बाजारात विक्र ीला आहे.पण हा घाऊक माल आणणारे हे बिगर मराठी आहेत.त्यामुळे आता हा व्यवसायही मराठी माणसाकडून हिरावला जातो का? अशी भीती वाटू लागली आहे, असे गीता येलेकर यांनी सांगितले.त्या गेली तीस-पस्तीस वर्षे बारमाही हा व्यवसाय करतात.
पूर्वी चाकावर मातीचा गोळा ठेवून पणत्या बनवत त्यामुळे ओल्या मातीला निरनिराळे आकार देऊन पणत्या ,माठ सुरया बनवत ते एक कसब होते.चाक फिरवणो हीसुद्धा कला आहे. आता ती चाके गेली त्याऐवजी विजेवर चालणारी चाके आली.शिवाय हाताने वस्तू बनवण्यापेक्षा साच्यातल्या वस्तूत सुबकता असते.सारखेपणा असतो यामुळे ग्राहक तिकडे चटकन आकर्षित होतो.पूर्वी मातीच्या पणत्या एक रात्नभर पाण्यात भिजवाव्या लागत त्यामुळे तेल कमी लागते.आता पीओपीच्या किंवा शाडू मातीच्या पणत्यांना ऑईलपेंट देऊन रंगवून त्यावर नक्षीकाम केलेल्या पणत्या पाण्यात टाकाव्या लागत नाहीत.त्यात निरनिराळे प्रकारही आहेत. दोन रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत पणत्यांचे दर आहेत. तर पीओपीचे किल्ले तीनशे ते पाचशे रुपयांपासून दीड हजारांपर्यंत आहेत.
बच्चे कंपनीचे छत्नपती शिवाजी महाराज 1क् रुपयापासून 15क् रुपयापर्यंत साईजप्रमाणो आहेत. भगवा, हिरवा, किरमिजी, सोनेरी वर्ख लावलेल्या सिंहासनावर बसलेल्या शिवाजींना बच्चे कंपनीची जशी पसंती आहे त्याचप्रमाणो तोफा डागणारे,घोडय़ावर स्वार झालेल्या शत्नूशी युद्ध करणा:या मावळय़ांना विशेष मागणी आहे.
साच्यात बनवलेल्या मावळय़ांचे हात तलवारी या मातीतच असतात पण हाताने बनवलेल्या मावळय़ांचे हात पाय मोकळे असतात त्यामुळे त्याना अधिक मागणी आहे.
पूर्वी कल्याणात बनवलेले मावळे बाहेरचे दुकानदार घाऊक खरेदी करीत पण आता कुंभारवाड्यातील उद्योजकांना बाहेरून माल खरेदी करून पुरवावा लागतो. (वार्ताहर)